Arshad Nadeem Historic Javelin Throw: गोल्ड मेडल जिंकल्यानंतर अर्शद नदीम ढसाढसा रडला, व्हिडिओ झाला व्हायरल

Arshad Nadeem Wins Gold Medal: स्पर्धेत अर्शद नदीम याचे सुरुवात फाऊलने झाली. परंतु पुढच्या मिनिटांत संपूर्ण जगाला त्याने आपला करिश्मा दाखवला. 92.97 मीटर लांब भाला फेकला. आपणच सिंकदर असल्याचे त्याने सिद्ध केले. त्यानंतर शेवटच्या प्रयत्नात त्याने चमत्कार केला. त्यावेळी त्याने 90 मीटर लांब भाला फेकला

Arshad Nadeem Historic Javelin Throw: गोल्ड मेडल जिंकल्यानंतर अर्शद नदीम ढसाढसा रडला, व्हिडिओ झाला व्हायरल
Arshad Nadeem
Follow us
| Updated on: Aug 09, 2024 | 1:45 PM

Arshad Nadeem Wins Gold Medal: पॅरीस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सुवर्णपदकाचे दावेदार होते. अगदी क्रिकेटमधील रोमांचक लढतीप्रमाणे ही लढत झाली. या स्पर्धेत पाकिस्तानचा खेळाडू अर्शद नदीम याने विक्रमी भालाफेक करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. त्याने 92.97 मीटर लांब भाला फेकला. भारताच्या नीरज चोप्रा याने आपला पूर्वीची विक्रम मोडत 89.45 मीटर लांब भाला फेकत रौप्य पदक मिळवले. नीरज चोप्रा याने यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटरचा थ्रो करत सुवर्णपदक जिंकले होते.

का ढसाढसा रडला अर्शद

स्पर्धेत अर्शद नदीम याचे सुरुवात फाऊलने झाली. परंतु पुढच्या मिनिटांत संपूर्ण जगाला त्याने आपला करिश्मा दाखवला. 92.97 मीटर लांब भाला फेकला. आपणच सिंकदर असल्याचे त्याने सिद्ध केले. त्यानंतर शेवटच्या प्रयत्नात त्याने चमत्कार केला. त्यावेळी त्याने 90 मीटर लांब भाला फेकला. यानंतर त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये तो ढसाढसा रडत असताना दिसत आहे. इंटरनेट युजरचा दावा आहे की, सुवर्णपदक जिंकल्यानंतरचा हा क्षण आहे. त्यानंतर अर्शद आपल्या भावना रोखू शकला नाही.

हे सुद्धा वाचा

नीरजच्या आईची मुलाखतीची चर्चा

अर्शदच्या विजयानंतर रौप्य पदक विजेत्या नीरज चोप्राच्या आईने संपूर्ण मानवतेला आदर्श वाटणारे वक्तव्य केले आहे. नीरजची आई सरोज देवी म्हणाली, आम्हाला तर सिल्वरसुद्धा गोल्ड प्रमाणे वाटत आहे. ज्या मुलाने गोल्ड मिळवले, तो सुद्धा आमचाच मुलगा आहे. नीरज चोप्रा याच्या आईचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी खेळाडू वृत्तीची भावना जागृत करत संपूर्ण जगाचे ह्रदय जिंकले आहे.

अर्शद याच्या विजयानंतर सोशल मीडियावर डोपिंगच्या मुद्याची चर्चा होत आहे. लोकांना त्या रेकॉर्ड थ्रोवर संशय आहे. परंतु त्यासंदर्भात ओएसीकडून काहीच प्रतिक्रिया आलेली नाही. जर अर्शद नदीम डोपिंग टेस्टमध्ये सापडला तर त्याच्याकडून सुवर्णपदक परत घेतले जाईल.

अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.