IND vs PAK Kabaddi | कबड्डी टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, पाकिस्तानवर धमाकेदार विजय

Asian Games 2023 India vs Pakistan Kabaddi Semi Final Match Result | कबड्डी टीम इंडियाने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव करत फायनलमध्ये पोहचण्याचं स्वप्न भंग केलंय. टीम इंडियाने यासह पदक निश्चित केलंय.

IND vs PAK Kabaddi | कबड्डी टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, पाकिस्तानवर धमाकेदार विजय
Follow us
| Updated on: Oct 06, 2023 | 2:55 PM

बिजिंग | एशियन गेम्स 2023 स्पर्धेत टीम इंडियाच्या खेळाडूंकडून वैयक्तिक आणि सांघिक पातळीवर पदकांची लयलटू सुरु आहे. क्रिकेट टीम इंडियानंतर आता कबड्डी टीम इंडियाने आता सिलव्हर मेडल निश्चित केलं आहे. कबड्डी मेन्स टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये आपल्या कट्ट्रर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला गाडलंय. टीम इंडियाने पाकिस्तानवर मात करत फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानवर 61-14 अशा एकतर्फी फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत रुबाबदार एन्ट्री घेतली आहे. आता शनिवारी 7 ऑक्टोबर रोजी अंतिम सामन्यात टीम इंडियाचा इराण किंवा चीन तेपे विरुद्ध या दोघांपैकी एका टीमविरुद्ध लढाई होईल.

टीम इंडियाने या सामन्यात सुरुवातीपासून घट्ट पकड मिळवली होती. टीम इंडियाने पहिल्या हाफमध्ये आपला दबदबा कायम ठेवला. पहिल्या हाफच्या शेवटी टीम इंडियाने पाकिस्तानवर 30-5 अशा फरकाने आघाडी घेतली होती. त्यानंतर पुढे पाकिस्तान कमबॅक करत टीम इंडियावर कुरघोडी करेल, अशी अपेक्षा पाकिस्तानच्या चाहत्यांना होती. मात्र पाकिस्तानला ते अखेपर्यंत काही जमलं नाही. टीम इंडियाने शेवटपर्यंत पाकिस्तानवर दबदबा कायम ठेवत विजय मिळवला.

टीम इंडियाचं मिशन गोल्ड

क्रिकेट टीम इंडिया फायनलमध्ये

दरम्यान क्रिकेट टीम इंडियानेही 6 ऑक्टोबर रोजी अंतिम सामन्यात एन्ट्री करत पदक निश्चित केलंय. टीम इंडियाने पहिल्या सेमी फायनलमध्ये बांगलादेशवर 9 विकेट्सने विजय मिळवला. आता टीम इंडियाचा गोल्ड मेडलसाठी फायनलमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध सामना होणार आहे. टीम इंडियाने बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 96 धावांवर ऑलआऊट केलं. त्यामुळे टीम इंडियाला 97 धावांचं आव्हान मिळालं. टीम इंडियाने हे आव्हान फक्त 1 विकेटच्या मोबदल्यात पू्र्ण केलं. टीम इंडियाने 97 धावा या 9.2 ओव्हरमध्येच पूर्ण केल्या.

नेपाळ विरुद्ध खणखणीत शतक ठोकणारा यशस्वी जयस्वाल बांगलादेश विरुद्ध अपयशी ठरला. यशस्वी झिरोवर आऊट झाला. मात्र त्यानंतर तिलक वर्मा आणि कॅप्टन ऋतुराज गायकवाड या दोघांनी टीम इंडियाला विजयापर्यंत पोहचवलं. या दोघांनी 97 धावांची नाबाद भागीदारी केली. ऋतुराजने 26 बॉलमध्ये नॉट आऊट 40 रन्स केल्या. तर तिलक वर्मा याने 26 बॉलमध्ये तोडफोड अर्धशतक केलं. तिलकने 6 सिक्स आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 55 धावा केल्या.

टीम इंडियाकडे किती मेडल्स?

दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार टीम इंडियाच्या खात्यात आता एकूण 89 मेडल्स झाले आहेत. यामध्ये टीम इंडियाकडे सर्वाधिक 36 कांस्य पदकं आहेत. 32 रौप्य पदकं आहेत. तर 21 गोल्ड मेडल्स आहेत.

Non Stop LIVE Update
उमेदवारी मिळाली तर... लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांच सूचक वक्तव्य
उमेदवारी मिळाली तर... लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांच सूचक वक्तव्य.
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?.
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास.
मोदींचा फोटो लावून जिंकायचे पण आता कळेल....फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान
मोदींचा फोटो लावून जिंकायचे पण आता कळेल....फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान.
बीड लोकसभा कोण लढवणार? प्रीतम की पंकजा मुंडे कोण उतरणार मैदानात?
बीड लोकसभा कोण लढवणार? प्रीतम की पंकजा मुंडे कोण उतरणार मैदानात?.
पुण्यात हवा कुणाची? कुणाविरूद्ध कोण लढणार? कुणाची नावं आघाडीवर?
पुण्यात हवा कुणाची? कुणाविरूद्ध कोण लढणार? कुणाची नावं आघाडीवर?.
जरांगेंना फक्त शरग पवारांचा फोन अन् त्यांनाच ते., कुणाचे सनसनाटी आरोप?
जरांगेंना फक्त शरग पवारांचा फोन अन् त्यांनाच ते., कुणाचे सनसनाटी आरोप?.
जीवाला जीव देणारे शिवसैनिक..., ठाकरे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली
जीवाला जीव देणारे शिवसैनिक..., ठाकरे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली.
राजकारणातला सुसंस्कृत चेहरा, कडवट अन्..शिंदेंकडून जोशींना श्रद्धांजली
राजकारणातला सुसंस्कृत चेहरा, कडवट अन्..शिंदेंकडून जोशींना श्रद्धांजली.
बाळासाहेबांचं 'ते' स्वप्न मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झाल - राज ठाकरे
बाळासाहेबांचं 'ते' स्वप्न मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झाल - राज ठाकरे.