Australian Open : नोवाक जोकोविच उपांत्य फेरीत पहिला सेट गमावताच आऊट, कारण..
टेनिस स्टार नोवाक जोकोविचचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. ऑस्ट्रेलियन ओपनचा दहावेळा जेतेपद मिळवलं आहे. मात्र यावेळी उपांत्य फेरीत फक्त एक सेट गमावताच आऊट झाला आहे. त्यामुळे अलेक्झांडर जेवरेवने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

सर्बियाचा टेनिस स्टार नोवाक जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. उपांत्यपूर्व फेरीत कार्लोस अल्कारेजला नमवत येथपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे जेतेपदासाठी त्याला प्रमुख दावेदार मानलं जात होतं. पण उपांत्य फेरीत अलेक्झांडर जेवरेवविरुद्ध पहिला सेट गमवताच जोकोविचने मैदान सोडलं. सामन्यात जोकोविचाला दुखापत झाली होती आणि त्याचा त्याला त्रास होत होत असल्याचं दिसत होतं. त्यामुळे त्याने सामना अधांतरीच सोडला आणि मैदानाबाहेर गेला. यामुळे जेवरेवला वॉकओवर मिळाला आणि थेट अंतिम फेरी गाठली आहे. नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या सुरुवातीपासून दुखापतग्रस्त दिसला.
उपांत्यपूर्व फेरीतही त्याने पायाला दुखापत झाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्याच्या प्रथमोपचार केले आणि सामना खेळला. इतकंच काय तर अल्कारेजविरुद्ध पहिला सेट गमवूनही कमबॅक केलं आणि सामना जिंकला. या सामन्यानंतर नोवाक जोकोविचने कोणताही सराव केला नाही. उपांत्य फेरीत खेळण्यासाठी रिकव्हरीवर लक्ष केंद्रित केलं. पण इतकं करूनही दुखापत काही कमी झाली नाही. उपांत्य फेरीतही जोकोविच पायाला पट्टी लावून उतरला होता.
Anyone else feeling devastated for Novak Djokovic?
This is not how it was supposed to end. 😭pic.twitter.com/KQ5v1znqa0
— Danny 🐊 (@DjokovicFan_) January 24, 2025
जोकोविचने पहिल्या सेटमध्ये चांगली सुरुवात केली. पण जेवरेवने कमबॅक करत 7-6 ने सेट आपल्या नावावर केला. या सेटवेळीच जोकोविचला दुखापत होत असल्याचं दिसत होतं. कसं बसं त्याने पहिला सेट पूर्ण केला. पण यानंतर हा सामना खेळण्याची ताकद त्याच्यात दिसत नव्हती. त्यामुळे पहिल्या सेटमध्ये पराभूत होताच त्याने सामना सोडला. सामन्यानंतर पायाचे स्नायूला दुखापत झाल्याचा खुलासा केला. जोकोविचने सामना सोडतात प्रेक्षकांनी त्याला डिवचण्यास सुरुवात केली.
मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी जोकोविचविरुद्ध हूटिंग केली. यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीत जोकोविचने दुखापतीचं कारण सांगत अल्कारेजविरुद्ध मेडिकल टाइम आऊट घेतलं होतं. काही जणांनी हा रणनितीचा भाग होता असा आरोपही केला. यामुळे प्रेक्षक नाराज झाला होते आणि जोकोविचविरोधात घोषणाबाजी केली होती.