AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thomas Cup 2022 : थॉमस चषक जिंकून बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन मायदेशी परतला,अशक्य काहीच नाही, लक्ष्य सेनची पहिली प्रतिक्रिया

आम्हाला माहित होते की आम्ही कोणत्याही संघाला हरवू शकतो. आमचा विचार एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याचा होता.

Thomas Cup 2022 : थॉमस चषक जिंकून बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन मायदेशी परतला,अशक्य काहीच नाही, लक्ष्य सेनची पहिली प्रतिक्रिया
थॉमस चषक जिंकून बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन मायदेशी परतलाImage Credit source: ANI
| Updated on: May 17, 2022 | 12:15 PM
Share

मुंबई :  15 मे रोजी थॉमस कप (Thomas Cup 2022) जिंकून भारतासाठी इतिहास रचणारा बॅडमिंटनपटू (Badminton player) लक्ष्य सेन (Lakshya Sen) मायदेशी परतलाय. बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना लक्ष्य सेन म्हणाला की, भारतासाठी हा खरोखर अभिमानाचा क्षण आहे. प्रत्येकजण एक संघ म्हणून एकत्र आले आहेत. लक्ष्य सेननेही यावेळी सांगितलं की, फायनलमध्ये पूर्णपणे वेगळे वातावरण होते. मी पहिल्या गेम गमावल्यामुळे सामन्यात माझी सुरुवात चांगली झाली नाही. मला वाटले की मी दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये खरोखरच गोष्टी बदलणार का. शेवटच्या टप्प्यात मी घाबरलो होतो, पण मी सुरक्षित खेळलो आणि घाई केली नाही. सेन म्हणाला की, ‘आम्ही स्पर्धेत इतक्या पुढे जाऊ असे आम्हाला वाटले नव्हते पण एक गोष्ट नक्की होती, आम्हाला माहित होते की आम्ही कोणत्याही संघाला हरवू शकतो. आमचा विचार एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याचा होता आणि निकालाचा विचार करू नका. कारण काहीही अशक्य नाही, असंही सेन यावेळी म्हणाला.

तो क्षण खूप खास

दरम्यान, टीम मॅनेजर विमल कुमार यांनी सांगितले की, सात्विक आणि चिराग हे दुहेरीचे संयोजन म्हणून खरोखरच चांगली कामगिरी करत आहेत. बॅडमिंटन जागतिक महासंघाच्या क्रमवारीतही तो पहिल्या दहामध्ये आहे. मला खात्री होती. आम्हाला प्रेरणेची गरज आहे. जेव्हा पंतप्रधानांनी फोन केला तेव्हा मी खूप प्रभावित झालो. तो क्षण खूप खास होता, असं ते यावेळी म्हणालेत.

“जेव्हा संघ निश्चित करण्यात आला, तेव्हा हे स्पष्ट होते की आमच्याकडे लक्ष्य, श्रीकांत आणि प्रणॉय हे एकेरीतील सर्वोत्तम तीन खेळाडू आहेत. मला विश्वास होता की जर तो त्याच्या क्षमतेनुसार खेळला तर तो कोणालाही पराभूत करू शकतो, असं लक्ष्य म्हणाला,

बॅडमिंटनपटू सात्विक काय म्हणाला?

बॅडमिंटनपटू सात्विक साई राज रंकीरेड्डी म्हणाला की, ‘दुहेरीत खेळणे सोपे नाही. एक समज असणे आवश्यक आहे. चिराग एक काळजी घेणारा माणूस आहे आणि आमचा बंध विशेष आहे. या स्वप्नवत विजयातून बाहेर पडण्यासाठी मला आणखी एक महिना लागेल.’

पंतप्रधानांचा कॉल येतो तेव्हा..

लक्ष्यचे वडील धीरेंद्र कुमार सेन म्हणाले की, जेव्हा पंतप्रधान मोदी बोलले तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटले. त्यांना आमच्या मूळ निवासस्थानाबद्दल देखील माहिती होती. ज्यामुळे जिंकण्याची प्रेरणा मिळाली. त्यांना आमच्याबद्दल माहिती आहे हे आम्हाला आवडले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशीही आम्ही व्हिडिओ कॉलवरुन संवाद साधला.

काहीही अशक्य नाही

मला वाटते की मी दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये खरोखरच गोष्टी बदलल्या. शेवटच्या टप्प्यात मी घाबरलो होतो, पण मी सुरक्षित खेळलो आणि घाई केली नाही. सेन म्हणाला की, ‘आम्ही स्पर्धेत इतक्या पुढे जाऊ असे आम्हाला वाटले नव्हते पण एक गोष्ट नक्की होती, आम्हाला माहित होते की आम्ही कोणत्याही संघाला हरवू शकतो. आमचा विचार एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याचा होता आणि निकालाचा विचार करू नका. कारण काहीही अशक्य नाही, असंही सेन यावेळी म्हणाला.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.