AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA: या संघात देशाचे खेळाडू सोडा, स्वत:चा कोचही नाही! शालेय बसमधून थेट वर्ल्डकप स्पर्धेत आणि नोंदवला गोल

Curacao vs Germany: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या चार संघांमध्ये कुरासाओ एक देश आहे. या देशाला पहिल्याच सामन्यात 7-1 पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पण जर्मनीविरुद्ध एक गोल केला आणि त्याची ऐतिहासिक नोंद झाली. विशेष म्हणजे कुरासाओ संघात खेळणारे खेळाडूही त्या देशाचे नाहीत.

FIFA: या संघात देशाचे खेळाडू सोडा, स्वत:चा कोचही नाही! शालेय बसमधून थेट वर्ल्डकप स्पर्धेत आणि नोंदवला गोल
FIFA: या संघात देशाचे खेळाडू सोडा, स्वत:चा कोचही नाही! शालेय बसमधून थेट वर्ल्डकप स्पर्धेत आणि नोंदवला गोलImage Credit source: PTI
| Updated on: Jun 15, 2026 | 3:31 PM
Share

Curacao, FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा रंजक कथांनी भरलेला आहे. कारण प्रत्येक संघाची काही ना काही कहाणी आहे. असाच एक संघ या स्पर्धेत पहिल्यांदा उतरला आहे. कुरासाओ हा देश पहिल्यांदाच फिफा वर्ल्डकप स्पर्धा खेळत आहे. या स्पर्धेत जर्मनीविरुद्धच्या सामन्यात 7-1 पराभवाची धूळ चाखावी लागली. पण पदार्पणाच्या सामन्यात मारलेल्या एका गोलची नोंद इतिहासात झाली आहे. यापूर्वी कुरासाओने कधीच फिफा वर्ल्डकप स्पर्धा खेळली नव्हती. फिफा वर्ल्डकप स्पर्धेत खेळणारा कुरासाओ एक छोटा देश आहे. हा देश कॅरेबियन बेटांवरील आहे. या देशाची लोकसंख्या जवळपास दीड लाखांच्या आसपास आहे. कुरासाओ देश इतका छोटा आहे की, अवघ्या 50 मिनिटात पूर्ण देश फिरून होईल. असं असताना या स्पर्धेत कुरासाओ उतरला खरा पण खेळाडूही त्यांच्या देशाचे नाहीत.

खेळाडू आणि कोचही देशाचे नाहीत

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदा खेळणाऱ्या कुरासाओ संघात एक खेळाडू सोडला तर बाकीचे सर्व खेळाडू नेदरलँडचे आहेत. ताहित चाँग हा एकमेव खेळाडू कुरासाओ देशाचा आहे. त्याचा जन्म कुरासाओमध्ये झाला, पण नंतर नेदरलँडमध्ये शिफ्ट जाला. ताहित रॉटरडमध्ये लहानाचा मोठा झाला आणि अंडर 21 फुटबॉल संघातून खेळला आहे. खेळाडूंसोबत कुरासाओ देशाचा कोचही स्वत:च्या देशाचा नाही. कोच डिक एडवोकाट हे सुद्धा नेदरलँडचे आहे. त्यामुळे कुरासाओचा संघ हा नेदरलँडचा ब संघ आहे असं म्हंटलं तर चुकीचं ठरणार आहे. डिक एडवोकाटे मुलीची तब्येत खालावल्याने कुरासाओ संघाचं प्रशिक्षकपद सोडलं होतं. पण मे महिन्यात पुन्हा एकदा कोचिंग सुरू केलं. तसेच प्रशिक्षक म्हणून फीफा वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

कुरासाओ संघात सर्वाधिक नेदरलँडचे खेळाडू का?

कुरासाओ 2010 पासून किंगडम ऑफ नेदरलँडच्या अधिपत्याखाली आहे. त्यामुळे संघावर नेदरलँडचा प्रभाव दिसत आहे. या कारणामुळेच संघात नेदरलँडचे खेळाडू खेळत आहेत. कुरासाओचा खेळाडू जुनिन्हो बाकुनाने उघडपणे कबूल केले की, नेदरलँड्सकडून खेळण्याची संधी मिळणार नाही हे माहीत होते, म्हणून त्याने कुरासाओची निवड केली.

View this post on Instagram

A post shared by Benched (@benchednation)

कुरासाओ संघ एका जुन्या शालेय बसमधून फिफा वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्यासाठी सज्जा झाला आहे. या बसला धड खिडक्यासुद्धा नव्हत्या. फिफा विश्वचषकातील कुरासाओ संघात भविष्यात कशी कामगिरी करेल हे येत्या काही सामन्यानंतर कळेल. पण शालेय बसमधून त्यांचा झालेला प्रवेश अविस्मरणीय ठरला आहे.

Follow Us
पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला....
Maharashtra Monsoon Session | पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला विरोधक घेरणार!
अखेर तेच घडलं! ...म्हणून नेते बैठकीला गैरहजर; ठाकरेंचा पक्षात पुन्हा
अखेर तेच घडलं! ...म्हणून नेते बैठकीला गैरहजर; ठाकरेंचा पक्षात पुन्हा फूट पडणार? काही खासदार थेट...
मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर आता पुन्हा दबाव!
महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप
Kalyan | महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप; स्मार्ट मीटरवरून कल्याणमध्ये हल्लाबोल!
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल, काय मिळालं उत्तर?
वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन
मोठी बातमी! मनोरंजन विश्व हादरलं; वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन, नेमकं काय घडलं?
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसल
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसलं तिकडे स्वबळाची भाषा; राजकारणात मोठं वादळ?
संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; ठाकरेंचा भाजपला सल्ला
Sharmila Thackeray | आमची पोरं कशाला चोरता, संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; शर्मिला ठाकरेंचा भाजपला सल्ला
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस उपस्थित
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार शाळांमध्ये उपस्थित
सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
Manoj Jaranage | सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत