Euro 2020 : बेल्जियमला मात देत इटली विजयी, सेमीफायनलमध्ये स्पेनशी होणार सामना

यूरो 2020 च्या उपांत्य पूर्व फेरीत इटलीने बेल्जियमला एका गोलच्या फरकाने मात देत सेमी फायनल गाठली आहे. सेमीफायनलमध्ये इटली स्पेनशी भिडणार आहे.

Euro 2020 : बेल्जियमला मात देत इटली विजयी, सेमीफायनलमध्ये स्पेनशी होणार सामना
इटली विरुद्ध बेल्जियम सामन्यातील एक क्षण
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 5:04 PM

म्युनिक : युरोपियन देशांत सर्वांत मानाची फुटबॉल स्पर्धा असणाऱ्या युरो चषक (Euro Cup 2020) स्पर्धेत आतापर्यंत सर्वच सामने चुरशीचे झाले असून आता स्पर्धा अंतिम टप्प्य़ात पोहोचली आहे. उपांत्य पूर्व फेरीचे दोन सामने झाले असून इटली (Italy) आणि स्पेन (Spain) हे दोन संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत. इटलीने शुक्रवारी झालेल्या सामन्यात बेल्जियमला (Belgium) 2-1 च्या फरकाने नमवत सेमीफायनल गाठली आहे. सुरुवातीपासून नावाला साजेशी खेळी करत इटलीच्या संघाने युरो चषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. (In Quarter Final of Euro 2020 Italy beat Belgium by 2-1 and Enters in Semi final)

संपूर्ण सामन्यात बेल्जियमचा स्टार खेळाडू रोमेलू लुकाकू (Romelu Lukaku) याने बरेच प्रयत्न केले पण इटलीचा डिफेन्स त्याला अधिकवेळा भेदता न आल्याने तो सामन्यात एकच गोल करु शकला. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघ एकमेकांना जमके टक्कर देत होते. चुरशीच्या चाललेल्या सामन्याच्या 31 व्या मिनिटालाा इटलीच्या निकोलो बेरेला (Nicolo Barella) याने पहिला गोल करत इटलीला आघाडी मिळवून दिली. जी आघाडी 44 व्या मिनिटाला इटालीच्या लोरेंजोने (Lorenzo Insigne) गोल करत 2-0 अशी केली.

बेल्जियमची कडवी झुंज अपयशी

सामन्यात मध्यांतर होत असताना इटलीने 2-0 ची आघाडी घेतली होती. बेल्जियमवर दबाव असताना स्टार खेळाडू रोमेलोने संघाला मिळालेल्या पेनल्टीच्या जोरावर एक गोल करत संघाला दिलासा मिळवू दिला. सामन्यात स्कोर 2-1 झाला आणि बेल्जियमने सामन्यात पुन्हा एन्ट्री घेतली. पण त्यानंतर बेल्जियमला एकही गोल करता आला नाही. ज्यामुळे 2-1 च्या फरकाने अखेर इटलीचा संघ विजयी झाला.

सेमीफाइनलमध्ये स्पेनशी भिडणार

तिकडे स्वित्झर्लंड आणि स्पेन यांच्यात झालेल्या उपांत्य पू्र्व फेरीच्या सामन्यात दोन्ही संघानी संपूर्ण वेळ संपेपर्यंत एक-एकच गोल केला होता. त्यामुळे पेनल्टी शूटआऊट खेळवण्यात आला. ज्यामध्ये 3-1 च्या फरकाने स्पेनने विजय मिळवत सामना आपल्या नावे केला. या विजयामुळे स्पेनही सेमीफायनलमध्ये पोहोचली असून इटली आणि स्पेन यांच्यात 7 जुलैला भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12 वाजून 30 मिनिटांनी सेमीफायनचा सामना रंगणार आहे.

हे ही वाचा :

Euro 2020 : बाद फेरीचे सामने संपले, आता 8 अंतिम संघामध्ये रंगणार युद्ध, वाचा उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक

Euro 2020 : रोमहर्षक सामन्यात स्पेनचा विजय, क्रोएशियाला नमवत नवा रेकॉर्डही केला नावे

Euro 2020 : रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ पराभूत, स्पर्धेतून बाहेर, मैदानावर रोनाल्डोसह प्रतिस्पर्धीही भावूक

(In Quarter Final of Euro 2020 Italy beat Belgium by 2-1 and Enters in Semi final)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.