Video : Euro 2020 मध्ये अद्भुत गोलची नोंद, मैदानाच्या मध्यातून लगावला जादूई गोल

चेक रिपब्लक आणि स्कॉटलंड यांच्यातील सामन्यात चेकसाठी विजयाचा शिल्पकार ठरलेल्या पॅट्रिक शिकने हा गोल लगावला.  

Video : Euro 2020 मध्ये अद्भुत गोलची नोंद, मैदानाच्या मध्यातून लगावला जादूई गोल
चेक रिपब्लक विरुद्ध स्कॉटलंड

ग्लासगो : यूरो कप 2020 स्पर्धेत सोमवारी चेक रिपब्लिक (Czech Republic) आणि स्कॉटलंड (Scotland) यांच्यात झालेल्या सामन्यात चेकने 2-0 च्या फरकाने शानदार विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला चेकचा फॉरवर्ड प्लेयर पॅट्रिक शिक (Patrik Schick). शिकने सामन्यात अप्रतिम दोन गोल करत संघाला विजय मिळवून दिला. पण या गोलपैकी एक गोल हा युरो चषकाच्या इतिहासातील अप्रतिम गोल्सपैकी एक ठरला. मैदानाच्या मध्यातून शिकने केलेल्या या गोलची चर्चा सर्वत्र आहे. (In UEFA Euro 2020 With Patrik Schicks Awsome goal Czech Republic Beat Scotland)

सामन्यात सुरुवातीला हाल्फ टाईमसाठी 3 मिनिटं शिल्लक असताना 42 व्या मिनिटाला शिकने व्लादिमिर कुफॉलच्या क्रॉसवर पहिला गोल नोंदवला. त्यानंतर दुसरा हाल्फ सुरु होताच चेककडून 7 मिनिटाच्या आतच शिकने अद्भुत गोल करत संघाला 2-0 ची आघाडी मिळवून दिली. पण हा गोल साधासुधा नव्हता तर स्पर्धेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल असाच होता.

45 मीटर दूरवरुन लगावला गोल

सामन्यात 1-0 ची आघाडी असताना चेकच्या शिकने 52 व्या मिनिटाला मैदानाच्या मध्यावरुन उंच शॉट मारत गोल करण्याचा प्रयत्न केला. स्कॉटलंडचा गोलकिपरही काहीसा पुढे आला असल्याने त्याचे बॉलपर्यंत पोहचणे अशक्य झाले आणि बॉल थेट गोलपोस्टमध्ये शिरला. शिकने हा गोल गोलपोस्टपासून सुमारे 45 मीटरच्या अंतरावरुन दागला होता. हा गोल पाहिल्यानंतर सर्वचजण हैरान झाले या गोलचा व्हिडीओही सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे.

स्कॉटलंडची झुंज अयशस्वी

सामन्याच्या पहिल्या हाल्फपर्यंत स्कॉटलंडने चांगला खेळ दाखवला. काही अॅटॅक देखील केले. पण चेक रिपब्लिकचा गोलकीपर टोमाष वातश्लिकने अप्रतिम सेव्ह करत एकही गोल होऊ दिला नाही. त्यानंतर हाल्फ टाईम व्हायला 3 मिनिटं शिल्लक असताना 42 व्या मिनिटाला चेकच्या व्लादिमिर कुफॉलच्या अप्रतिम क्रॉसवर शिकने हेडरद्वारे सुंदर गोल करत सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या हाल्फमध्ये पुन्हा चेकच्या शिक याने अप्रतिम गोल करत सामन्यात 2-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर स्कॉटलंडने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. पण त्यांना यश न आल्याने सामना 2-0 ने चेक रिपब्लिकच्या खिशात गेला.

हे ही वाचा :

Euro 2020 : चेक रिपब्लिकचा स्कॉटलंडवर विजय, स्लोवाकियाचीही विजयी सुरुवात

Euro 2020 : इंग्लंडची क्रोएशियावर मात, ऑस्ट्रियाचाही जबरदस्त विजय

Euro 2020: फिनलँडचा ऐतिहासिक विजय, वेल्स आणि स्वित्झर्लंडमधील सामना अनिर्णीत, बेल्जियमची रशियावर मात

(In UEFA Euro 2020 With Patrik Schicks Awsome goal Czech Republic Beat Scotland)

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI