AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ISSF World Cup : नेमबाज मेराज अहमद खानने जिंकले सुवर्णपदक, रचला इतिहास, जाणून घ्या…

मेराज अहमद खानने पुरुषांच्या स्कीट स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक पटकावले आहे. विश्वचषकाच्या स्कीट स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा मेराज हा पहिला भारतीय पुरुष नेमबाज आहे. त्याच्या या यशाचं कौतुक होतंय.

ISSF World Cup : नेमबाज मेराज अहमद खानने जिंकले सुवर्णपदक, रचला इतिहास, जाणून घ्या...
मेराज अहमद खानImage Credit source: social
| Updated on: Jul 20, 2022 | 7:47 AM
Share

नवी दिल्ली : दक्षिण कोरियाच्या चांगवॉनमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत (ISSF World Cup) भारतीय (Indian) नेबाजांनी आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवली आहे. अनुभवी नेमबाज मेराज अहमद खान (Shooter Meraj Ahmad Khan) याने सोमवारी आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या स्कीट स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले. 40 शॉटच्या फायनलमध्ये 46 वर्षीय मेराजने 37 धावा करत कोरियाच्या मिन्सू किम आणि ब्रिटनच्या बेन लेवेलिन यांचा पराभव केला. विश्वचषकाच्या स्कीट स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा मेराज अहमद खान हा पहिला भारतीय पुरुष नेमबाज आहे. दोनवेळा ऑलिम्पियन राहिलेल्या मेराज आणि यावेळी चांगवॉनमध्ये भारतीय दलातील सर्वात जुने सदस्य 2016च्या रिओ दी जानेरो विश्वचषक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. नेमबाज मेराज अहमद खान याने सोमवारी आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या स्कीट स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकल्याने त्यांचं कौतुक होतंय.

ट्विट

भारत अव्वल

यापूर्वी अंजुम मोदगील, अशी चोक्सी आणि सिफ्ट कौर समरा यांनी महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. कांस्यपदकाच्या लढतीत तिने ऑस्ट्रियाच्या शैलेन वाईबेल, ऑन उंगेरँक आणि रेबेका कोक यांचा 16-6 असा पराभव केला. पाच सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्यांसह भारत अद्याप पदकतालिकेत अव्वल आहे.

मेराज बुलंदशहरचा

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील असलेल्या मेराजने शुटिंगला येण्यापूर्वी क्रिकेटमध्येही हात आजमावला आहे. मेराजने खुर्जाच्या केपी माँटेसरी स्कूलमधून पाचवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर बुलंदशहर येथील कॉन्व्हेंट शाळेतून आठवी केल्यानंतर खुर्जातूनच त्याने दहावी प्लस टू केले. त्यानंतर तो जामियाला गेला. मेराजचे वडील दिल्लीच्या प्रगती मैदानात हॉटेल व्यावसाय करायचे.

मेराजला क्रिकेटची आवड

मेराजला लहानपणापासून क्रिकेटची आवड होती आणि तो जामियाच्या क्रिकेट संघात सामील झाला. पण त्याच्या काकांनी मेराजचा डोळा संपर्क आणि कोपराचा कोन पाहून त्याला शूटिंगला येण्याची प्रेरणा दिली आणि इथूनच मेराज शूटिंगला गेला. मेराजची आवड नेमबाजीत बदलली आणि पदक जिंकणे हे त्याचे लक्ष्य बनले.

रिफो आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग

गेल्या दोन दशकात मेराजने विश्वचषक नेमबाजीपासून अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत. सप्टेंबर 2015मध्ये स्किट शूटिंगमध्ये पात्रता मिळवून रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा तो पहिला भारतीय ठरला. अंतिम फेरीत फक्त एका गुणाने हुकला. नोव्हेंबर 2019मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये अंगद बाजवाचा 1-2ने पराभव करून त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान निश्चित केले.

काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.