Neeraj Chopra : व्वा भाई व्वाsss! नीरज चोप्रानं स्वतःचाच विक्रम मोडला, अन् केला राष्ट्रीय विक्रम

नीरजची 10 महिन्यांनंतरची ही पहिलीच स्पर्धा होती आणि त्याने दुसऱ्या प्रयत्नात 89.30 मीटर लांब भाला फेक केली.

Neeraj Chopra : व्वा भाई व्वाsss! नीरज चोप्रानं स्वतःचाच विक्रम मोडला, अन् केला राष्ट्रीय विक्रम
Neeraj Chopra Image Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 8:55 AM

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) नवा राष्ट्रीय विक्रम (National Record) केलाय आहे. मात्र, असं असलं तरी त्याला सुवर्णपदक (Gold medal) जिंकता आलं नाही. हरियाणाच्या लालला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलंय. फिनलंडमध्ये सुरू असलेल्या पावो नुर्मी गेम्समध्ये त्याने 89.03 मीटर लांब भाला फेक केली. त्याआधी त्यानं 87.58 मीटर लांब भाला फेक केली होती. ज्यामुळे त्याला गेल्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळालं होतं. ऑलिम्पिकनंतर 10 महिन्यांनी नीरज चोप्राची ही पहिलीच स्पर्धा होती. पहिल्याच प्रयत्नात त्यानं 86.92 मीटर फेक केली. तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या प्रयत्नातही त्याने खूप प्रयत्न केले, पण तो केवळ 85.85 मीटरच पार करू शकला. 24 वर्षीय नीरज चोप्राने शानदार पुनरागमन करण्यासाठी कठोर परिश्रम आणि सराव केला होता.

ऑलिव्हियर हेलँडरला सुवर्णपदक

पावो नूरमी ही जागतिक ऍथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूरमधील सुवर्ण स्पर्धा आहे. ही डायमंड लीग नंतरची सर्वात मोठी ट्रॅक आणि फील्ड स्पर्धा मानली जाते. 89.93 मीटर अंतरावर भालाफेक करणाऱ्या फिनलंडच्या ऑलिव्हियर हेलँडरला सुवर्णपदक मिळाले. या खेळांमध्ये सहभागी होणारा नीरज हा एकमेव खेळाडू होता. या रौप्य पदकाने नीरज चोप्राचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याच्याकडून कामगिरी अपेक्षित आहे.

हे सुद्धा वाचा

नीरजला दुसरे स्थान मिळाले

नीरजची 10 महिन्यांनंतरची ही पहिलीच स्पर्धा होती आणि त्याने दुसऱ्या प्रयत्नात 89.30 मीटर लांब भाला फेक केली. ही भालाफेक आता त्याचा सर्वोत्तम थ्रो बनलाय. त्याने पहिल्याच प्रयत्नात 86.92 मीटर भालाफेक केली. नीरजचा तिसरा, चौथा आणि पाचवा प्रयत्न फेल ठरला. नीरजनं शेवटच्या प्रयत्नात 85.85 मीटर भालाफेक पूर्ण केली.

नीरजनं स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला असेल पण फिनलंडच्या ऑलिव्हियर हेलँडरच्या मागे दुसरा क्रमांक पटकावलाय. ज्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. हेलँडरने 89.93 मीटरसह अव्वल स्थान पटकावलंय. नीरज चोप्राने यापूर्वी गेल्या वर्षी मार्चमध्ये पतियाळा येथे 88.07 मीटरचा राष्ट्रीय विक्रम केला होता. त्यानं 7 ऑगस्ट 2021 रोजी 87.58 मीटर फेक करून टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त.
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा.
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल.