नीरज तुला सलाम! देशासाठी रौप्य जिंकणारा नीरज चोप्रा या आजाराने त्रस्त, सर्जरीबाबत पॅरिसमधून मोठी अपडेट

सर्व भारतीयांना नीरजकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. परंतु रौप्यपदकावरच समाधान मानावं लागलं होतं. पण एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

नीरज तुला सलाम! देशासाठी रौप्य जिंकणारा नीरज चोप्रा या आजाराने त्रस्त, सर्जरीबाबत पॅरिसमधून मोठी अपडेट
Follow us
| Updated on: Aug 09, 2024 | 10:07 PM

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी नीरज चोप्राने रौप्य पदक मिळवत शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला आहे. भालाफेकमध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. सर्व भारतीयांना नीरजकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. परंतु रौप्यपदकावरच समाधान मानावं लागलं होतं. पण एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे नीरजला त्रास होत असताना देशासाठी तो खेळला. सुवर्ण नाही आलं पण त्याने हा त्रास होत असताना जिंकलेले रौप्य सुवर्णपदकापेक्षाही मोठं आहे.

नीरज चोप्रा कोणत्या आजाराने त्रस्त?

ऑलिम्पिकपदक विजेता नीरज चोप्रा रौप्यपदक विजेता आहे. नीरजला हर्नियाचा त्रास होत असताना त्याने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं. फायनल झाल्यावर नीरजनेही त्याला त्रास होत असल्याचं सांगितलं. मी माझ्या टीमशी बोलेन आणि त्यानुसार सर्जरीबाबत निर्णय घेईल. माझ्यात आणखी क्षमा आहे फक्त मला फिट राहवं लागणार असल्याचं नीरज चोप्राने म्हटलं आहे.

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2014 मध्ये रौप्य पदक जिंकले. 8 ऑगस्ट रोजी झालेल्या अंतिम सामन्यात नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटर फेक केली. पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक जिंकले. अर्शदने दुसऱ्या प्रयत्नात 92.97 फेक करत ऑलिम्पिक विक्रम रचला.

ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकल्यावर आता त्याच्या कोटिंग स्टाफमध्ये बदल होणार आहे. नीरज चोप्राचे सध्याचे प्रशिक्षक क्लॉस बार्टोनिट्झ हे आता जास्त दिवस नसणार आहेत. क्लॉस बार्टोनिट्झ 2018 पासून नीरजसोबत वर्षातील काही महिने काम करत होते. नीरज आणि त्यांची टीम स्टाफमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे.

भारताने आतापर्यंत जिंकले पाच पदक

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत 5 पदके जिंकली आहेत. यामध्ये चार कांस्य आणि एक रौप्यपदकाचा समावेश आहे. मनु भाकरने 10 मीटर एअर पिस्तुलमध्ये कांस्यपदक आणि मिश्र सांघिक स्पर्धेत दुसरे मिश्र सांघिक कांस्यपदक जिंकलं. त्यानंतर स्वप्नील कुसाळेने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत तिसरे कांस्यपदक जिंकलं. तर हॉकी संघाने कांस्यपदक आणि नीरज चोप्राने रौप्यपदक पटकावले.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.