PKL 2021-22: U Mumba vs Jaipur Pink Panthers: यू मुंबाचा अभिषेक बच्चनच्या टीमवर मोठा विजय

PKL 2021-22 : प्रो कबड्डी लीगच्या (Pro kabbadi league) आजच्या पहिल्या सामन्यात यू मुंबाने जयपूर पिंक पँथर्सवर मोठा विजय मिळवला.

PKL 2021-22: U Mumba vs Jaipur Pink Panthers: यू मुंबाचा अभिषेक बच्चनच्या टीमवर मोठा विजय

बेंगळुरू: व्ही अजित कुमार आणि अभिषेक सिंहच्या दमदार खेळाच्या बळावर यू मुंबाने आजच्या दिवसातील प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सवर विजय मिळवला. 37-28 असा नऊ गुणांच्या फरकाने यू मुंबाने जयपूर पिंक पँथर्सवर विजयाची नोंद केली. (Pro Kabaddi League PKL 2021 22 U Mumba beat Jaipur Pink Panthers)

पिंक पँथर्सकडून अर्जुन देसवालने जबरदस्त खेळ केला. पण त्याला अन्य सहकाऱ्यांकडून साथ मिळाली नाही. परिणामी संघाचा पराभव झाला. अजित कुमारने 11 आणि अभिषेक सिंहने 10 गुणांची कमाई केली. दोन्ही रेडर चालल्यामुळे मुंबईचा विजय सुकर झाला. बेंगळुरु बुल्स विरुद्ध दमदार खेळ दाखवल्यानंतर अभिषेक सिंहचा सूर हरवल्याचे दिसत होते. पण अभिषेक चांगला खेळतो, तेव्हा मुंबई जिंकते हे पुन्हा एकदा आजच्या सामन्यातून दिसून आलं आहे.

शेवटच्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने यूपी योद्धाव निसटता विजय मिळवला होता. याआधीचा तमिळ थलायवाज विरुद्धचा यू मुंबाचा सामना टाय झाला होता. आज जयपूरवर मिळवलेल्या विजयामुळे यू मुंबाचा संघ गुणतालिकेत वरती येईल.

संबंधित बातम्या:

Ajinkya Rahane: मराठमोळ्या मुंबईकर अजिंक्य रहाणेला अजून एक चान्स मिळेल?

IND VS SA: सचिनला तेंडुलकरला फोन फिरवं, गावस्करांचा विराट कोहलीला प्रेमाचा सल्ला

U-19 Asia Cup 2021: टीम इंडिया फायनलमध्ये श्रीलंकेला भिडणार

Published On - 8:44 pm, Thu, 30 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI