U-19 Asia Cup 2021: टीम इंडिया फायनलमध्ये श्रीलंकेला भिडणार

सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा डाव 44.5 षटकात 147 धावात आटोपला.

U-19 Asia Cup 2021: टीम इंडिया फायनलमध्ये श्रीलंकेला भिडणार
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 7:58 PM

यूएई: सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताने 113 धावांनी जिंकला. परदेशातील भारताच्या या कसोटी विजयाचा समस्त भारतीय क्रिकेट चाहत्यांना आनंद आहेच. पण त्याचवेळी आनंदाची आणखी एक बातमी आहे. सेंच्युरियनपासून हजारो किलोमीटर अंतरावर भारताच्या ज्यूनियर संघानेही कमाल केली आहे. यश ढुलच्या नेतृत्वाखाली भारताच्या अंडर-19 टीमने आशिया कपच्या फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. भारताचा अंतिम सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. (U-19 Asia Cup 2021Team india beat bangladesh in semi final now will fight against sri lanka in final)

सेमीफायलनमध्ये भारताच्या युवा संघाने बांगलादेशचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या अंडर-19 टीमने आठ विकेट गमावून 243 धावा केल्या. टीम इंडियाकडून एस रशीदने चमकदार फलंदाजी केली. त्याने 108 चेंडूत नाबाद 90 धावा केल्या. या खेळीत तीन चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता.

दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या फलंदाजांचा भारताच्या धारदार गोलंदाजीसमोर निभाव लागला नाही. विकी ओस्टवाल आणि राजवर्धन हंगर्गेकरच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशचा डाव 38.2 षटकात 140 धावात गुंडाळला. भारताने 103 धावांनी मोठ्या विजयाची नोंद केली. बांगलादेशकडून आरिफुल इस्लामने सर्वाधिक 42 धावा केल्या.

सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा डाव 44.5 षटकात 147 धावात आटोपला. पाकिस्तानसमोर फार मोठे लक्ष्य नव्हते. पण त्यांचा डाव 49.3 षटकात 125 धावात आटोपला.

संबंधित बातम्या: 

IND VS SA: इतका राग बरा नव्हे, सिराजने बावुमाला मैदानावर फेकून मारला बॉल Ajinkya Rahane: मराठमोळ्या मुंबईकर अजिंक्य रहाणेला अजून एक चान्स मिळेल? IND VS SA: सचिनला तेंडुलकरला फोन फिरवं, गावस्करांचा विराट कोहलीला प्रेमाचा सल्ला

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.