पीटी उषा यांचे प्रशिक्षक ओएम नांबियार यांचे निधन, एएफआयने व्यक्त केला शोक

केरळच्या कन्नूरमधील पाययोली जवळ एका छोट्या गावात जन्म झालेले (योगायोगाने हे पीटी उषाचे देखील जन्मस्थान आहे) नांबियार त्याच्या महाविद्यालयीन काळात एक चॅम्पियन अॅथलिट होते. त्यांच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी नंबियार यांना सैन्यात भरती होण्याचा आणि अॅथलेटिक्समध्ये करिअर करण्याचा सल्ला दिला.

पीटी उषा यांचे प्रशिक्षक ओएम नांबियार यांचे निधन, एएफआयने व्यक्त केला शोक
पीटी उषा यांचे प्रशिक्षक ओएम नांबियार यांचे निधन
Follow us
| Updated on: Aug 19, 2021 | 9:17 PM

नवी दिल्ली : पीटी उषासारखे भारताला उड्डाण देणारे द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त प्रशिक्षक ओएम नांबियार यांचे गुरुवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांना या वर्षी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. तसेच, 1984 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये पीटी उषाच्या कामगिरीनंतर, तिला 1985 मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आला. पीटी उषा व्यतिरिक्त, नांबियार यांनी चार ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या शायनी विल्सनचे देखील प्रशिक्षक देखील होते. त्यांनी 1985 च्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 800 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर ते देशातील दिग्गज धावपटू वंदना राव यांचेही प्रशिक्षक होते. त्यांनी 1968 मध्ये एनआयएस पटियालामधून कोचिंगमध्ये डिप्लोमा केला आणि 1971 मध्ये केरळ स्पोर्ट्स काऊन्सिलमध्ये सामील झाला. (PT Usha’s coach OM Nambiar passes away, AFI expresses grief)

पीटी उषाला ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याचे होते स्वप्न

आपली सर्वात प्रसिद्ध शिष्या उषाला ऑलिम्पिक पदक मिळवणे हे त्यांचे सर्वात मोठे स्वप्न होते, जरी ती 1984 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकापासून दूर राहिली होती. अलीकडेच त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते, ‘1984 ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत उषा एका सेकंदाच्या फरकाने पदकापासून वंचित राहिली हे कळल्यावर मी खूप रडलो होतो. मी रडतच राहिलो. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. उषाचे ऑलिम्पिक पदक हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न होते. 35 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या वर्षी जेव्हा त्यांची पद्मश्रीसाठी निवड झाली तेव्हा ते म्हणाले, “माझ्या शिष्यांनी जिंकलेल्या प्रत्येक पदकामुळे मला प्रचंड समाधान मिळते. द्रोणाचार्य पुरस्कार, सर्वोत्कृष्ट आशियाई प्रशिक्षक पुरस्कार आणि आता पद्मश्री हे माझ्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ आहे.’

खेळाडूनंतर नंबियार यांनी प्रशिक्षक म्हणून केली नवीन सुरुवात

केरळच्या कन्नूरमधील पाययोली जवळ एका छोट्या गावात जन्म झालेले (योगायोगाने हे पीटी उषाचे देखील जन्मस्थान आहे) नांबियार त्याच्या महाविद्यालयीन काळात एक चॅम्पियन अॅथलिट होते. त्यांच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी नंबियार यांना सैन्यात भरती होण्याचा आणि अॅथलेटिक्समध्ये करिअर करण्याचा सल्ला दिला. सर्व प्रयत्न करूनही ते आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करू शकले नाही. अशा परिस्थितीत, एक अॅथलीट म्हणून आपली कारकीर्द संपवत त्यांनी कोचिंगचा मार्ग निवडला.

नांबियार आपल्या स्वप्नांना त्यांच्याद्वारे निर्माण केलेल्या प्रतिभांच्या माध्यमातून स्वप्ने पूर्ण करायची होती. कोचिंग डिप्लोमा केल्यानंतर, केरळमधील क्रीडा कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या जी.व्ही.राजा यांनी राज्यातील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी केरळमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. 1970 मध्ये त्यांनी केरळ क्रीडा परिषदेत प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला. येथेच 1976 मध्ये त्यांना पीटी उषा भेटली आणि दोघांचा प्रवास सुरू झाला. (PT Usha’s coach OM Nambiar passes away, AFI expresses grief)

इतर बातम्या

त्याचं चालणं संशयित, घाईगडबडीत रेल्वेत शिरला, हातवारे करताना पोलिसांनी घेरलं, बॅग उघडताच नोटांचे अक्षरश: बंडल

अफगाणिस्तान: जिथं सिकंदर थकला, औरंगजेबाचा दारुण पराभव झाला, रशिया-अमेरीकेनं पळ काढला

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.