AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA World Cup 2026 स्पर्धेचा पहिल्याच सामन्यात रेकॉर्ड, गोल नाही तर रेड कार्डमुळे रंगली चर्चा

फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद कोण मिळणार हे आता जशी स्पर्धा पुढे जाईल तेव्हा कळेल. पण या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात विक्रमाची नोंद झाली. हा सामना रोमहर्षक झाला, पण आश्चर्यकारकही ठरला. कारण रेफरीने खेळाडूंना इंगा दाखवला.

FIFA World Cup 2026 स्पर्धेचा पहिल्याच सामन्यात रेकॉर्ड, गोल नाही तर रेड कार्डमुळे रंगली चर्चा
FIFA World Cup 2026 स्पर्धेचा पहिल्याच सामन्यात रेकॉर्ड, गोल नाही तर रेड कार्डमुळे रंगली चर्चाImage Credit source: Getty Images
| Updated on: Jun 12, 2026 | 3:28 PM
Share

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेची सुरूवात यजमान मेक्सिको आणि दक्षिण अफ्रिका सामन्याने झाली. हा सामना पाहण्यासाठी मेक्सिको सिटीच्या प्रसिद्ध अझ्केटा स्टेडियममध्ये 85 हाजाराहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. या स्पर्धेत मेक्सिकोनो दक्षिण अफ्रिकेला 2-0 ने मात दिली. तसेच मैदानात उपस्थित असलेल्या आपल्या चाहत्यांना खूश केलं. या स्पर्धेत यजमान मेक्सिकोने विजयी सुरूवात केली. पण हा हा सामना वेगळ्या कारणानेही चर्चेत राहिला. कारण या सामन्यात रेफरीने खेळाडूंना त्यांच्या चुकांसाठी इंगा दाखवला. मैदानात बेशिस्तपणे वागणाऱ्या खेळाडूंना रेड कार्ड दाखवलं. पंचांनी एक दोन नाही तर तीन खेळाडूंना रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर पाठवलं. त्यामुळे फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.

पहिल्याच सामन्यात विक्रमी रेड कार्ड

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील मेक्सिको आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील सामना गोलपेक्षा खेळाडूंच्या बेशिस्तपणामुळे चर्चेत राहिला. या सामन्यात मेक्सिकोने विजय मिळवला, पण रेड कार्डमुळे अधिक चर्चा झाली. या सामन्यात एकूण 23 फाउल झाले. यात मेक्सिकोने 12, तर दक्षिण अफ्रिकेने 11 फाउल केले. पण गंभीर फाउलचा प्रश्न आला तेव्हा पंचांना कोणतीही दयामाया दाखवली नाही. दक्षिण अफ्रिकेच्या खेळाडूला या स्पर्धेतील पहिलं रेड कार्ड दाखवण्यात आलं. या सामन्यातील 50 मिनिटाला दक्षिण अफ्रिकेचा मिडफिल्डर याया सिथोले याला रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढलं.

सामन्याच्या 84व्या मिनिटाला दक्षिण अफ्रिकेच्या थेम्बा झ्वानेला याला रेड दाखवण्यात आलं. थेम्बाने 60व्या मिनिटांनंतर मैदानात एन्ट्री घेतली होती. पण अवघ्या 24 मिनिटात रेड कार्ड मिळालं आणि मैदानाबाहेर पडला. दुसरीकडे, मेक्सिकोन या सामन्यात 2 गोल मारत आघाडी घेतली होता. असं असताना शेवटच्या काही मिनिटात मेक्सिकोचा बचावपटू सेझार मॉन्टेस बेशिस्तीमुळे रेफरीच्या रडारवर आला. इंज्युरी टाइममध्ये 90+2 मिनिटे झाली असताना त्याला मैदानाबाहेर पाठवलं.

मेक्सिकोचा एकहाती विजय

यजमान मेक्सिकोने स्पर्धेतील पहिला सामना गाजवला. या सामन्याच्या नवव्या मिनिटाला पहिला गोल करत आघाडी घेतली. मेक्सिकोचा लेफ्ट विंगर ज्युलियन क्विनोनेसने एरिक लिराच्या पासवर या स्पर्धेतील पहिल्या गोलची नोंद केली. यासह त्याने पहिला गोल मारत इतिहास रडला. त्यानंतरही मॅक्सिकोने आक्रमक पण गोल दागण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही. पहिल्या हाफमध्ये 1-0 ने आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये 67व्या मिनिटाला स्टार स्ट्रायकर राउल हिमिनेजने दुसरा गोल मारला आणि 2-0 ने आघाडी घेतली. दक्षिण अफ्रिकेने गोलच्या दिशेने 16 शॉट मारले, पण पाच गोलपर्यंत पोहोचले आणि ते अडवले गेले.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप