AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashwin : तुम्ही वैभव सूर्यवंशीचा तिरस्कार कसा करु शकता? दांबुलच्या वादानंतर अश्विनच्या संतापाचा स्फोट

Ashwin On Vaibhav Sooryavanshi : दांबुलामध्ये श्रीलंकन अ संघातील खेळाडूंसोबत वैभव सूर्यवंशीची वादावादी झाली होती. त्यावरुन त्याच्यावर टीका करण्यात आली. भारताचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन या प्रकरणात वैभवच्या बाजूने उभा राहिला आहे. त्याने टीकाकारांचा समाचार घेतला.

Ashwin : तुम्ही वैभव सूर्यवंशीचा तिरस्कार कसा करु शकता? दांबुलच्या वादानंतर अश्विनच्या संतापाचा स्फोट
Ashwin On Vaibhav SooryavanshImage Credit source: PTI
| Updated on: Jun 24, 2026 | 10:03 AM
Share

टीम इंडियाचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेत आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय डेब्यूकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. आयर्लंड विरुद्ध वैभवला टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते. अंडर-19, इंडिया ए कडून तो खेळला आहे. आयपीएलमधील दमदार कामगिरीच्या बळावर वैभव सूर्यवंशीने सिनियर टीम इंडियात स्थान मिळवलं आहे. वैभव सूर्यवंशीच जसं कौतुक होतय तसच श्रीलंकेतील त्याच्या वर्तनावर टीका सुद्धा झाली. दांबुलामध्ये श्रीलंकन अ संघातील खेळाडूंसोबत वैभव सूर्यवंशीची वादावादी झाली होती. त्यावरुन त्याच्यावर टीका करण्यात आली. भारताचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने या घटनेवर भाष्य करताना वैभव सूर्यवंशीचं समर्थन केलं आहे.

सुपर ओव्हरमध्ये भारतीय अ संघाचा पराभव झाल्यानंतर ही वादावादीची घटना घडली होती. चाहते आणि क्रिकेट एक्सपर्ट्स मध्ये यावर बरीच चर्चा झाली. अश्विनला वाटतं की गरजेपेक्षा जास्त चर्चा झाली. टीका करताना ती व्यक्तिगत होऊ नये असंही अश्विनचं मत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काय गरजेचं आहे, ते वैभव शिकतोय असं अश्विन म्हणाला. अश्विन त्याच्या युट्यूब शो मध्ये बोलत होता. त्या एका क्षणावरुन अनेकांनी वैभव सूर्यवंशीला टार्गेट केल्याबद्दल अश्विनला विचारण्यात आलं.

अश्विन टीकाकारांना काय म्हणाला?

“आपण तिरस्काराने बोलतो पण त्यानंतर काय होतं? आपण ज्याचा तिरस्कार करतोय त्याने या गोष्टी नंतर वाचल्या तर त्याच्यावर थोडाफार परिणाम होऊ शकतो. पण असं बोलून आपण काय मिळवणार आहोत?. म्हणूनच मी म्हणतोय तुम्ही वैभव सूर्यवंशीचा तिरस्कार कसा करु शकता?” असा सवाल अश्विनने केला. वैभव सूर्यवंशीकडून परिपक्तवेतची अपेक्षा करणाऱ्यांना सुद्धा अश्विनने सुनावलं. वैभव बद्दल कुठलही मत प्रगट करण्याआधी तु्म्ही त्याचं वय आणि अनुभव दोन्ही लक्षात घ्या असं अश्विन टीकाकारांना म्हणाला.

आपणही कधीकाळी मुलं होतो?

“तुम्ही मला सांगा, तुम्ही त्याचा कसा द्वेष करु शकता. सगळे बोलतायत की, त्याने परिपक्तवता दाखवावी. अजून परिपक्वतेने त्याने बोललं पाहिजे. आपण हे विसरतोय का, की आपणही कधीकाळी मुलं होतो? आपल्या कुटुंबातही वैभव सारखी मुलं आहेत हे आपण विसरतो का?. हा खूप भयानक ट्रेंड आहे” असं अश्विन बोलला.

Follow Us
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन