VIDEO | मोहम्मद रिझवानचा जॉन्टी रोड्स अवतार, डाईव्ह मारली आणि 29 वर्षापूर्वीच्या आठवणी ताज्या

काही प्रसंग असे घडून जातात की त्यामधून क्रिकेटमधील जुन्या आठवणी ताज्या होतात. (Pakistan South Africa Mohammad Rizwan)

VIDEO |  मोहम्मद रिझवानचा जॉन्टी रोड्स अवतार, डाईव्ह मारली आणि 29 वर्षापूर्वीच्या आठवणी ताज्या
मोहम्मद रिझवानने अशा प्रकारे डाईव्ह मारली

लाहोर : क्रिकेटमध्ये अशा काही घटना घडतात, ज्या काही चमत्कारापेक्षा कमी वाटत नहीत. काही प्रसंग असे घडून जातात की त्यामधून क्रिकेटमधील जुन्या आठवणी ताज्या होतात. पाकिस्तान आणि साऊथ आफ्रिकादरम्यान झालेल्या टी-20 सामन्यातही असाच एक प्रसंग घडला. पाकिस्तानी यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याने साऊथ आफ्रिकेच्या (South Africa) रिजा हेन्ड्रिक्सला धावबाद करताना अशाच जुन्या आठवणी ताज्या झाल्या. (Pakistan vs South Africa T20 match Mohammad Rizwan diving)

साऊथ आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्स (Jonty Rhodes) क्षेत्ररक्षणाचा बादशाहा म्हणून गणला जातो. क्रिकेटमधील क्षेत्ररक्षणामध्ये त्यांने क्रांतीकारी बदल केलेले आहेत. त्याने 1992 मध्ये पाकिस्तानसोबतच्या एका सामन्यात डाईव्ह घेत ईंझमाम उल हकला (Inzamam ul Haq) धावबाद केले होते. या प्रसंगाची क्रिकेटच्या इतिहासात अभूतपूर्व क्षेत्ररक्षण म्हणून नोंद आहे. त्यानंतर तब्बल 29 वर्षानंतर अगदी तशाच प्रकारे क्षेत्ररक्षण करत पाकिस्तानी यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानने जॉन्टी रोड्सच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

प्रसंग काय ?

पाकिस्तान आणि साऊथ आफ्रिका या दोन देशांमध्ये सध्या टी-20 सामने सुरु आहेत. या दोन संघांमध्ये 11 फेब्रवारी रोजी झालेला सामना चांगलाच चर्चेमध्ये राहिला. पाकिस्तानने सुरुवातीला फलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद रिझवानने केलेल्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने 169 धावांचा पल्ला गाठला. त्यानंतर साऊथ आफ्रिकेच्या संघाकूडन रिजा हेन्ड्रिक्सने अर्धशतक पूर्ण करत पाकिस्तानला जेरीस आणले. हेन्ड्रिक्सला बाद करणे गरजेचे असल्यामुळे पाकिस्तानी खेळाडू संधीच्या शोधात होते.

शेवटी 17 चेंडूमध्ये 36 धावांजी गरज असल्यामुळे हेन्ड्रिक्स गडबडीत खेळत होता. एका चेंडूला सामोरे जाताना चेंडू नेमका कुठे गेला याचा त्याला ताळमेळ लागला नाही. त्यामुळे हेन्ड्रिक्स क्रीजच्या बाहेर गेला. परिणामी यष्टीरक्षण मोहम्मद रिझवानने संधी मिळताच त्याच्याकडे असेलला चेंडू डाईव्ह मारत स्टंपकडे भिरकावला. परिणामी हेन्ड्रिक्स धावबाद झाला.

दरम्यान, या प्रसंगामुळे मागील 29 वर्षींच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्याचे म्हटलेज जात आहे. मोहम्मदने केलेल्या क्षेत्ररक्षणाची सगळीकडे चर्चा होत आहे. अपेक्षेप्रमाणे साऊथ आफ्रिका 20 षटकांमध्ये 166 धावा काढू शकला. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तानचा 3 धावांनी विजय झाला.

मोहोम्मद रिझवान डाईव्ह मारतानाचा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

‘वासिम, तू जे केलं ते योग्य, मी तुझ्यासोबत’, अनिल कुंबळेकडून जाफरची पाठराखण

India vs England | टीम इंडियाविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा

जय श्रीरामच्या घोषणा रोखल्या, मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य, वासिम जाफरवर गंभीर आरोप

(Pakistan vs South Africa T20 match Mohammad Rizwan diving)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI