AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचं नाक कापलं! या दिग्गज खेळाडूचे भयंकर कांड समोर; आयसीसीने थेट रिपोर्टच पाठवला!

पाकिस्तानचा दिग्गद क्रिकेटर ड्रग्ज टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आला आहे. तसा रिपोर्ट आयसीसीने पीसीबी बोर्डाला दिला आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

पाकिस्तानचं नाक कापलं! या दिग्गज खेळाडूचे भयंकर कांड समोर; आयसीसीने थेट रिपोर्टच पाठवला!
mohammad NawazImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 22, 2026 | 6:27 PM
Share

Mohammad Nawaz : पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद नवाज आता एका वेगळ्याच संकटात सापडला आहे. मोहम्मद नवाज टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाचा भाग होता. याच विश्वचषकादरम्यान त्याची केलेली ड्रग्ज टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आयसीसीने त्याबाबतची माहिती आता पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला दिली आहे. त्यामुळे आता मोहम्मद नवाज चांगलाच अडचणीत सापडला आहे. नवाज ड्रग्ज डेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्याने आता पाकिस्तानी क्रिकेट संघाविषयीच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

नेमकं प्रकरण काय? काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार आयसीसीने मोहम्मद नवाजची ड्रग्ज टेस्ट केली होती. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे याबाबतचा रिपोर्ट आयसीसीने पाकिस्तानी क्रिकेट बोर्टाला पाठवला आहे. आता या प्रकरणाची पीसीबी चौकशी करणार आहे. मोहम्मद नवाजवर अचानक हे संकट आल्याने आता तो इंग्लंडमध्ये होणाऱ्या टी-20 ब्लास्ट स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.

ड्रग्ज टेस्ट कधी केली होती?

या वर्षाच्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पाकिस्तानी संघानेदेखील सहभाग घेतला होता. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जेले गोते. या स्पर्धेत मोहम्मद नवाज याने फक्त 15 धावा केल्या होत्या. तसेच गोलंदाजी करताना 7 बळी घेतले होते. दुसरीकडे 26 मे ते 18 जुलै या काळात टी-20 ब्लास्ट ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत मोहम्मद नवाजला एनओसी प्रमाणपत्र देण्यात आले होते. म्हणजेच आमचा त्याच्यावर कोणताही आक्षेप नाही, असे पीसीबीने म्हटले होते. असे असतानाच आयसीसीने त्याची ड्रग्ज टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचेस सांगितल्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. आता पुढे नेमके काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
शिंदेंनंतर आता सुनेत्रा पवारांनी घेतली मंत्र्यांची शाळा! थेट आदेश दिले
शिंदेंनंतर आता सुनेत्रा पवारांनी घेतली मंत्र्यांची शाळा! थेट आदेश दिले अन्... रडारवर कोणता मंत्री?
गडकरींच्या निवासस्थानाबाहेर मोठा गोंधळ, पोलिसांनी हात पाय पकडले अन्...
गडकरींच्या निवासस्थानाबाहेर मोठा गोंधळ, पोलिसांनी हात पाय धरले अन्... नागपूरात मोठ्या घडामोडी
नाशिकच्या पालकमंत्रीपदावर गिरीश महाजन यांचं सूचक विधान, म्हणाले...
Girish Mahajan | नाशिकच्या पालकमंत्रीपदावर गिरीश महाजन यांचं सूचक विधान, म्हणाले...
जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालणार नाही; इनोव्हा प्रस्तावावर...
मोठी बातमी! जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालणार नाही; इनोव्हा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांचा दणका
बालेकिल्ल्यातच भाजपला दुसऱ्या क्रमांकावर आणणारा नेता कोण? गेल्या 30...
बालेकिल्ल्यातच भाजपला दुसऱ्या क्रमांकावर आणणारा नेता कोण? गेल्या 30 वर्षांपासून...  बिहार पोटनिवडणूकीत सर्वात मोठा उलटफेर?
भाजप विरुद्ध भाजप? भर मंचावरून बड्या नेत्याचा राणा दांपत्यावर निशाणा,
भाजप विरुद्ध भाजप? भर मंचावरून बड्या नेत्याचा राणा दांपत्यावर निशाणा, नाव न घेताच...
CM-DCM कडून भरत गोगावले यांना आश्वासन; रायगडच्या पालकमंत्रीपदावर लवकरच
मोठी राजकीय घडामोड! CM-DCM कडून भरत गोगावले यांना आश्वासन; रायगडच्या पालकमंत्रीपदावर लवकरच शिक्कामोर्तब?
महिला कुस्तीपटू प्रकरणात बृजभूषण सिंह यांना मोठा दिलासा; 6 गंभीर...
6 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केलेले भाजप नेते बृजभूषण शरण सिंहंची निर्दोष मुक्तता
भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा...
मोठी घडामोड! भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा; काँग्रेसची पंकजा मुंडे यांना थेट ऑफर
न माथेरान न महाबळेश्वर, महाराष्ट्रातील या पर्यटनस्थळी एका दिवसाला...
न माथेरान न महाबळेश्वर, महाराष्ट्रातील या पर्यटनस्थळी एका दिवसाला 15 हजारांहून अधिक पर्यटक देतात भेट, पहा...