AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shreyas Iyer : माझ्या तोंडाला लागू नको…जिंकल्यानंतर श्रेयसचा संयम सुटला, आपल्याच प्लेयरबद्दल वापरले अपशब्द, VIDEO

Shreyas Iyer : IPL 2025 च्या क्वालिफायर 2 सामन्यात शानदार विजयानंतर पंजाब किंग्सचा कॅप्टन श्रेयस अय्यरने आपल्याच एका खेळाडूवर राग काढला. या घटनेचा व्हिडिओ वेगाने सोशल मीडियाीवर व्हायरल होतोय. जिंकल्यानंतर श्रेयस अय्यर इतका का चिडला? काय कारण आहे? जाणून घ्या.

Shreyas Iyer : माझ्या तोंडाला लागू नको...जिंकल्यानंतर श्रेयसचा संयम सुटला, आपल्याच प्लेयरबद्दल वापरले अपशब्द, VIDEO
Shreyas IyerImage Credit source: PTI
| Updated on: Jun 02, 2025 | 1:40 PM
Share

IPL 2025 च्या क्वालिफायर 2 मध्ये पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला 5 विकेटने हरवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. हा रोमांचक सामना 1 जून 2025 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला गेला. पंजाबने 204 धावांच लक्ष्य 19 व्या षटकात गाठलं. कॅप्टन श्रेयस अय्यर 41 चेंडूत नाबाद 87 धावांची शानदार इनिंग खेळला. त्याने टीमला विजय मिळवून दिला. विजयानंतर मैदानावर एक हैराण करणारं दृश्य दिसलं. श्रेयसने आपल्याच टीमचा खेळाडू शशांक सिंहवर राग काढला. त्याच्याबद्दल अपशब्द वापरले.

या सामन्यात श्रेयस अय्यरने सिक्स मारुन पंजाब किंग्सला विजय मिळवून दिला. त्यानंतर पारंपारिक हँडशेक करण्यासाठी दोन्ही टीम्स मैदानात आल्या. त्यावेळी श्रेयसचा राग दिसला. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतय की, शशांक सिंहला समोर पाहताच श्रेयसच्या तोंडातून अपशब्द निघाले. स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली. श्रेयसने आपल्या जवळ येण्यापासून शशांकला रोखलं. अय्यरच्या हावभावावरुन असं वाटतय की, तो शशांकला सांगत होता की, माझ्या तोंडाला लागू नको. ही घटना वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होतेय. शशांक ज्या पद्धतीने आऊट झाला, त्यामुळे श्रेयस त्याच्यावर चिडलेला असं बोललं जातय.

हार्दिक पंड्याने याचा फायदा उचलला

मॅचच्या 17 व्या ओव्हरमध्ये शशांक सिंह फक्त 2 रन्स बनवून आऊट झाला. त्यावेळी पंजाब विजयासाठी 21 चेंडूत 34 धावांची आवश्यकता होती. शशांकने ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर मिड-ऑनच्या दिशेने शॉट मारला. पण धाव घेताना बेजबाबदारपणा दाखवला. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने याचा फायदा उचलला. वेगाने डायरेक्ट हिट मारला. रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होतं, शशांक धाव पूर्ण करण्यासाठी चपळाई दाखवली नाही. डाइव्ह मारण्याचा सुद्धा त्याने प्रयत्न केला नाही. त्याची हीच चूक पंजाबसाठी अडचणचीठी ठरली असती, श्रेयसच्या शानदार फलंदाजीने टीमला विजय मिळवून दिला.

तो काही खास करु शकला नाही

शशांक सिंहसाठी हा सीजन खूप चांगला ठरलाय. त्याने 16 सामन्यात 13 इनिंगमध्ये 41.28 च्या सरासरीने 289 धावा केल्या आहेत. यात त्याचा स्ट्राइक रेट 145.95 चा आहे. त्याने टीमसाठी अनेक मॅच फिनिश केल्या आहेत. लोअर ऑर्डरमध्ये खेळताना 2 हाफ सेंच्युरी सुद्धा झळकवल्या आहेत. पण मुंबई विरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात तो काही खास करु शकला नाही. त्यामुळे श्रेयस अय्यर त्याच्यावर नाराज दिसला.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.