AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छोट्या शहरातून राष्ट्रीय पातळीवर नाव, तू तरुणांचा आयडॉल, मोदींचं धोनीला भावनिक पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महेंद्रसिंह धोनीला पत्र लिहून त्याच्या यशस्वी कारकीर्दीचं कौतुक केलं आहे (PM Narendra Modi send letter to Mahendra Singh Dhoni).

छोट्या शहरातून राष्ट्रीय पातळीवर नाव, तू तरुणांचा आयडॉल, मोदींचं धोनीला भावनिक पत्र
| Updated on: Aug 20, 2020 | 4:45 PM
Share

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर जगभरातील अनेक दिग्गजांनी त्याच्या कतृत्वाचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील धोनीला पत्र लिहून त्याच्या यशस्वी कारकीर्दीचं कौतुक केलं आहे. याबाबत महेंद्रसिंह धोनीने ट्विटरवर पंतप्रधान मोदींच्या पत्राचा फोटो शेअर करत आभार मानले आहेत (PM Narendra Modi send letter to Mahendra Singh Dhoni).

“एक कलाकार, सैनिक आणि खेळाडूला आपल्या कामाच्या कौतुकाची अपेक्षा असते. आपली मेहनत आणि बलिदानाची लोकांना जाणीव व्हावी, अशी त्यांची इच्छा असते. पंतप्रधान मोदी आपल्याकडून करण्यात आलेल्या कौतुकाबद्दल धन्याद”, असं महेंद्रसिंह धोनी म्हणाला आहे (PM Narendra Modi send letter to Mahendra Singh Dhoni).

पंतप्रधान मोदी पत्रात नेमकं काय म्हणाले?

“तुझ्या कर्तृत्वाकडे पाहिल्यावर नव्या भारताची संकल्पना तुझ्यात प्रतिबिंबित होताना दिसते. या नव्या भारतातील तरुण कोणत्याही कुटुंबातील असो, तो त्याच्या कुटुंबावरुन नाव कमवत नाही तर तो मेहनतीवर स्वत:ची जागा कमवतो आणि यशस्वी होतो”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

“तू 15 ऑगस्ट रोजी तुझ्या साध्या शैलीत एक व्हिडीओ जारी करत निवृत्तीची घोषणा केली. या घोषणेनंतर 130 कोटी भारतीय नाराज झाले. तू गेल्या दीड दशकात भारतासाठी जे काम केलं त्यासाठी धन्यवाद”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“तू भारतीय क्रिकेटच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेस. भारताला जगातील सर्वोच्च संघ बनविण्यात तुझी महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. क्रिकेट विश्वाच्या इतिहासात, तुझं नाव जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये, सर्वोत्तम कर्णधारांमध्ये आणि अर्थातच सर्वोत्तम यष्टिरक्षकांपैकी एक असेल” असं मोदींनी पत्रात सांगितलं.

“कठीण प्रसंगातही तुझी कामाची पद्धत, सामना संपवण्याची तुझी शैली, विशेष करुन 2011 च्या विश्वचषकाचा अंतिम सामाना हा पिढ्यांपिढ्या लोकांच्या लक्षात राहील” असं मोदी म्हणाले.

“एका छोट्या शहराहून राष्ट्रीय पातळीवर तू नाव कमवलं. तुझ्या कतृत्वाने देशाचाही गौरव झाला. तुझा प्रवास हा कोट्यवधी तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. जे तरुण महागड्या शाळा आणि महाविद्यालयात शिक्षणासाठी गेले नाहीत, जे प्रतिष्ठित कुटुंबातून येत नाहीत, मात्र, त्यांच्यात स्वत:ला सिद्ध करण्याची क्षमता आहे, अशा तरुणांसाठी तुझा प्रवास प्रचंड प्रेरणादायी आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“आपली वाटचाल कुठल्या दिशेला सुरु आहे हे आपल्याला माहिती असलं तर आपण कुठून आलो आहोत, ही गोष्ट फारशी महत्त्वाची नसते. धोनी तू जगाला तेच दाखवून दिलं आणि कित्येक तरुणांना प्रेरित केलं”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

संबंधित बातमी : MS Dhoni Retirement | महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, आयपीएलमध्ये खेळणार

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.