PSL 2021: पाकिस्तानातील रोमांचक क्रिकेट स्पर्धा PSL ‘या’ कारणामुळे PCB कडून स्थगित

पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2021) कोरोना संसर्गाच्या आणखी तीन केसेस समोर आल्यानंतर ही टी -20 लीग त्वरित पुढे ढकलण्यात आली आहे. | PSL 2021 postponed PCB

PSL 2021: पाकिस्तानातील रोमांचक क्रिकेट स्पर्धा PSL 'या' कारणामुळे PCB कडून स्थगित
pakistan Super league postponed
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 4:13 PM

मुंबई : पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2021) कोरोना संसर्गाच्या आणखी तीन केसेस समोर आल्यानंतर ही टी -20 लीग त्वरित पुढे ढकलण्यात आली आहे. या स्पर्धेत एकूण सात खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. (PSL 2021 pakistan Super league postponed PCB over 3 Player Found Corona positive)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पर्धा पुढे ढकलत असल्याचं सांगताना निवेदनात म्हटले आहे की, “संघ मालकांशी होणारी बैठक आणि सर्व सहभागींचे आरोग्य लक्षात घेऊन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान सुपर लीग तत्काळ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेत कोरोना संसर्गाच्या 7 केसेस उद्भवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत 34 सामन्यांच्या स्पर्धेचे केवळ 14 सामने झाले आहेत.”

पीसीबीने सांगितले की, “आम्ही पुन्हा पुन्हा पीसीआर चाचण्या, विलगीकरण तसंच सर्व सहभागींच्या सुरक्षित प्रवासावर लक्ष केंद्रित करू.”.यापूर्वी पीसीबीने निवेदनात म्हटले होतं की दोन संघांतील आणखी तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत ते दहा दिवस विलगीकरणात राहतील.

पीसीबीने म्हटलंय की, ” आता कोरोना पॉझिटिव्ह मिळालेले हे तिन्ही खेळाडू बुधवारी झालेल्या पीएसएलच्या दोन सामन्यांचा भाग नव्हते. लक्षणे सापडल्यानंतर त्यांना तपासासाठी पाठविण्यात आले आहे.

बोर्डाने म्हटलंय, ‘पीएसएल 6 ची आयोजन समिती, संघाचे मालक आणि व्यवस्थापन यांच्यासमवेत ऑनलाईन बैठक घेतली जाईल, त्यानंतर पुढील अधिकची माहिती दिली जाईल. कोरोनाचे प्रतिबंधात्मक नियम पाळून पुढील स्पर्धा सुरु केली जाईल, अशी काळजी घेऊ, असं पीसीबीने म्हटलंय. (PSL 2021 pakistan Super league postponed PCB over 3 Player Found Corona positive)

इम्रान ताहिरच्या कृतीने जिंकली क्रीडा रसिकांची मनं, ‘खेळभावना असावी तर अशी…!’

पाकिस्तान सुपर लीगच्या (PSL 2021) 14 व्या सामन्यात मुल्तान सुल्तानकडून खेळणार्‍या दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहिरने ( South Africa Imran Tahir) क्वेटा ग्लेडिएटर्सविरूद्धच्या सामन्यादरम्यान एक अशी कृती केली ज्या कृतीची संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चा होतीय. पाकिस्तानमधल्या क्रिकेट स्पर्धेत खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या ताहिरने पाकिस्तानी दिवंगत खेळाडूला आपल्या कृतीने आदरांजली वाहिली. त्यामुळे त्याच्या खेळभावनेचं कौतुक होत आहे. (South Africa imran tahir tribute late Pakistani Cricketer Tahir Mughal PSL 2021)

इमरान ताहिरचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर चाहते खूपच भावूक झाले आहेत. खरं तर, ताहिरने ग्लेडिएटर्स संघाचा फलंदाज सॅम अयूबला बाद करताच त्याचा आनंद साजरा करण्यासाठी आपल्या अंगावरील टी-शर्ट काढला. जेव्हा इम्रानने आपला टीशर्ट उतरविला त्यावर पाकिस्तानचा माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू ताहिर मुगलचा फोटो होता. याच कृतीने त्याने क्रिकेट रसिकांची मने जिंकली.

हे ही वाचा :

Video | इम्रान ताहिरचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘खेळभावना असावी तर अशी…!’

IPL 2021 | CSK आयपीएलच्या आगामी मोसमासाठी सज्ज, ट्रेनिंग कॅंपसाठी धोनीसह युवा खेळाडू चेन्नईत

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.