AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Punjab Kings Scenario: पंजाब किंग्सचं प्लेऑफचं गणित फसलं! सलग पाच पराभवानंतर आता काठावरची लढाई

आयपीएल 2026 स्पर्धेतील शेवटच्या टप्प्यात मोठा ट्विस्ट आला आहे. पहिल्या टप्प्यात टॉपला असलेल्या पंजाब किंग्स संघाला प्लेऑफमध्ये जागा मिळवणं कठीण झालं आहे. सलग पाच पराभवानंतर या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची भीती आहे.

Punjab Kings Scenario: पंजाब किंग्सचं प्लेऑफचं गणित फसलं! सलग पाच पराभवानंतर आता काठावरची लढाई
Punjab Kings Scenario: पंजाब किंग्सचं प्लेऑफचं गणित फसलं! सलग पाच पराभवानंतर आता काठावरची लढाईImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 15, 2026 | 4:27 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीत आता प्रत्येक संघाचा एखाद दुसरा सामना शिल्लक राहिला आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सचा प्लेऑफचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे आता 8 संघांमध्ये प्लेऑफची चुरस असून ही शर्यत आता रंगतदार वळणावर आली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ काठावर आहेत. या दोन संघांचं स्पर्धेतील आव्हान तसं पाहिलं तर संपुष्टात आलं आहे. पण एखाद दुसरा सामना पार पडताच चित्र स्पष्ट होईल. दुसरीकडे, आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांनी 16 गुणांची कमाई केली असून त्याची प्लेऑफमधील जागा पक्की झाली आहे. तर इतर दोन जागांसाठी सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स, चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चुरस आहे. असं असताना आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात टॉपला असलेल्या पंजाब किंग्सची परिस्थिती नाजूक झाली आहे. सलग विजयानंतर आता सलग पाच पराभव पचवावे लागले आहेत. त्यामुळे प्लेऑफचा मार्ग कठीण झाला आहे.

पंजाब किंग्स आयपीएल 2026 स्पर्धेच्या पहिल्या सात सामन्यात 13 गुणांसह टॉपला होती. या संघाने सहा सामन्यात विजय मिळवला होता, तर एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने एक गुण मिळाला होता. त्यानंतर या संघाला सलग पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे 12 सामन्यानंतरही पंजाब किंग्सच्या पारड्यात 13 गुण आहेत. पंजाब किंग्सची पहिल्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे पुढचा सामना खेळण्यापूर्वी टॉप 4 मधून बाहेर जाऊ शकते. त्यामुळे पंजाब किंग्ससाठी उर्वरित दोन सामने खूपच महत्त्वाचे आहेत. या दोन्ही सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागेल.

पंजाब किंग्सचा पुढचा सामना 17 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. तर शेवटचा सामना 23 मे रोजी लखनौ सुपर जायंट्सशी होणार आहे. त्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचा सामना वाटतो तितका सोपा नाही. मागच्या पर्वात आरसीबीने फायनलसह तीन सामन्यात पराभवाची धूळ चारली होती. त्यात आरसीबी संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्यात हा सामना गमावला आणि लखनौ विरुद्ध सामना जिंकला तर 15 गुण होतील. त्यामुळे इतर संघाच्या कामगिरीवर लक्ष ठेवावं लागणार आहे.

पंजाब किंग्सला या दोन संघाकडून अडचण

पंजाब किंग्सला गुणतालिकेतील समीकरण पाहता चेन्नई सुपर किंग्सकडून संकट आहे. कारण चेन्नई सुपर किंग्सचे 11 सामन्यात 12 गुण आहेत. संघाचा 12वा सामना 15 मे रोजी लखनौ सुपर जायंट्शी होणार आहे. हा सामना जिंकताच चेन्नई सुपर किंग्स चौथ्या स्थानावर येईल. तर शेवटचे दोन सामने गुजरात आणि हैदराबादशी होणार आहे. जर हे दोन सामने जिंकले तर पंजाबची वाट बिकट होईल.

दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सची स्थिती पंजाब सारखीच आहे. या संघाची गाडीही पंजाबसारखी रूळावरून उतरली आहे. आता 11 सामन्यात 12 गुण आहेत. आता तीन पैकी 2 सामने जिंकणे भाग आहे. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सशी लढत होणार आहे. यापैकी दोन सामने जिंकले तरी पंजाबचा स्पर्धेतील पत्ता कट होईल.

Follow Us
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?.
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ......
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ.......
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील.
देशवासियांना सकाळ सकाळीच महागाईचा धक्का; नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेल....
देशवासियांना सकाळ सकाळीच महागाईचा धक्का; नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेल.....