French Open 2021 : नोवाक जोकोविचचा अप्रतिम विजय, राफेल नदालला पराभूत करत गाठली अंतिम फेरी

सर्बियाच्या नोवाक जोकोविचने स्पेनच्या राफेल नदालला पराभूत करत फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक घेतली आहे. 29 व्या वेळेस नोवाक ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. 

French Open 2021 : नोवाक जोकोविचचा अप्रतिम विजय, राफेल नदालला पराभूत करत गाठली अंतिम फेरी
nadal vs djokovic

पॅरीस : फ्रान्समध्ये सुरु असलेल्या फ्रेंच ओपन (French Open 2021) स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदालचा (Rafael Nadal) पराभव झाला आहे. सर्वाधिक वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या राफेलला सर्बियाच्या नोवाक जोकोविचने (Novak Djokovic) सेमीफायनलच्या सामन्यात पराभूत केले आहे. नोवाकने राफेलला सलग तीन सेट्समध्ये नमवत अंतिम फेरी गाठली आहे. क्ले कोर्टवरील या सामन्यात राफेलचा आतापर्यंतच्या 108 मॅचमधील हा तिसराच पराभव आहे. (Rafael Nadal Lost against Novak Djokovic in Semi Final of French Open 2021)

या विजयासह नोवाक 29 व्या वेळेस ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात पोहचला आहे. तर राफेल नदाल मागील चार वेळेपासून विजय मिळवत आला असून त्याच्या नावावर 20 ग्रँडस्लॅम आहेत. आतापर्यंतच्या सामन्यात नदालला केवळ तीन वेळेसच फ्रेंच ओपनमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. यातील दोन वेळेस जोकोविचने तर एकदा रोबिन सोडरलिंग याने नदालला पराभूत केले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यातील तिसरा सेट जवळपास 1 तास 33 मिनिटे चालला.

असा पार पडला सामना

सामन्याची सुरुवात नदालने जोरदार केली. बघता बघता त्याने पहिल्या सेटमध्ये 5-0 ची आघाडी घेतली. पण नोवाकने पण तीन गेम जिंकत सामन्यात चुरस बनवून ठेवली. पहिला सेट नदालने 6-3 च्या फरकाने जिंकला. पण दुसऱ्या सेटमध्ये नोवाकने सुरुवातीपासूनच वर्चस्व ठेवत 5-3 ने आघाडी घेतली नंतर राफेलने ही कडवी झुंज देत स्कोर 6-5 केला. सामना टाय ब्रेकमध्ये पोहोचताच निर्णायक सेट नोवाकने 7-4 ने जिंकत सामना आपल्या नावे केला.

नोवाक विजयाच्या उंबरठ्यावर

नोवाकला या विजयासह दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन तर 19 व्या वेळेस ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी मिळाली आहे. फायनलध्ये नोवाकचा सामना ग्रीसच्या स्टेफानोस सितसिपास याच्याशी होईल. नोवाक 29 व्या वेळेस ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात पोहोचला असून सितसिपास पहिल्यांदाच एखाद्या ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. सितसिपासने सेमीफाइनलमध्ये अँलेक्लेक्जेंडर ज्वेरेव याला 6-3, 6-3, 4-6, 4-6, 6-3 च्या फरकाने नमवत विजय मिळवला.

हे ही वाचा :

Euro 2020: सलामीच्या सामन्यात इटलीचा टर्कीवर दणदणीत विजय, युरो चषक स्पर्धेची दमदार सुरुवात

Video : Live सामन्यात शाकिब अल हसनला राग अनावर, अंपायरवर भडकून थेट स्टंपलाच मारली लाथ

IND vs SL : भारताचा श्रीलंका दौरा, सलामीला कोण उतरणार?, मधल्या फळीत कुणाला संधी? पाहा…

(Rafael Nadal Lost against Novak Djokovic in Semi Final of French Open 2021)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI