AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी रणजी क्रिकेटपटू शेखर गवळींचा ट्रेकिंगदरम्यान अपघात, पाय घसरुन दरीत पडले

माजी रणजी क्रिकेटपटू शेखर गवळी हे ट्रेकिंगदरम्यान पाय घसरुन दरीत कोसळल्याची घटना घडली (Ranji Cricketer Shekhar Gawli fell into Valley) आहे.

माजी रणजी क्रिकेटपटू शेखर गवळींचा ट्रेकिंगदरम्यान अपघात, पाय घसरुन दरीत पडले
| Updated on: Sep 01, 2020 | 10:18 PM
Share

नाशिक : माजी रणजी क्रिकेटपटू शेखर गवळी हे ट्रेकिंगदरम्यान पाय घसरुन दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. गवळी हे इगतपुरी परिसरात आपल्या सहकाऱ्यांसोबत ट्रेकिंग करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली. सध्या त्यांचा शोध घेतला जात आहे.  (Ranji Cricketer Shekhar Gawli fell into Valley)

मिळालेल्या माहितीनुसार, शेखर गवळी हे नाशिकच्या इगतपुरी परिसरात काही सहकाऱ्यांसोबत ट्रेकिंगसाठी गेले होते. त्यावेळी ते ट्रेकिंग करत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते थेट दरीत कोसळले. संध्याकाळी 5.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

या दुर्घटनेनंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. तसेच इतर स्थानिकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच आपत्कालीन यंत्रणेने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप त्यांचा काहीही शोध लागू शकला नाही.

दरम्यान त्यांचा शोध घेण्यासाठी नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी उद्या (2 सप्टेंबर) रवाना होणार आहे. त्यावेळी पुन्हा त्यांचा शोध घेतला जाईल.  शेखर गवळी हे महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहे. त्यामुळे या दुर्घटनेने क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना धक्का बसला आहे. (Ranji Cricketer Shekhar Gawli fell into Valley)

संबंधित बातम्या : 

Suresh Raina | चेन्नई सुपर किंग्जला धक्क्यावर धक्के, सुरेश रैना IPL मधून बाहेर

 रोहित शर्मासह पाच खेळाडूंना ‘खेलरत्न’ पुरस्कार, क्रीडा मंत्रालयाने मोहोर उमटवली

मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.