Rajiv Gandhi Khel Ratna Award | रोहित शर्मासह पाच खेळाडूंना ‘खेलरत्न’ पुरस्कार, क्रीडा मंत्रालयाने मोहोर उमटवली

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी गठित निवड समितीने केलेल्या शिफारसीवर या चौघांच्या नावावर मोहोर उमटवली आहे. (Rajiv Gandhi Khel Ratna Award declare)

Rajiv Gandhi Khel Ratna Award | रोहित शर्मासह पाच खेळाडूंना 'खेलरत्न' पुरस्कार, क्रीडा मंत्रालयाने मोहोर उमटवली

नवी दिल्ली : टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा, कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला हॉकी टीमची कर्णधार राणी रामपाल आणि पॅरालिम्पिक चॅम्पियन मरियप्पन थांगावेलू, टेबल टेनिस चॅम्पियन मनिका बत्रा यांना यावर्षीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी गठित निवड समितीने केलेल्या शिफारसीवर या चौघांच्या नावावर मोहोर उमटवली आहे. (Rajiv Gandhi Khel Ratna Award declare)

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा रोहित हा भारताचा चौथा क्रिकेटर ठरणार आहे. सचिन तेंडुलकर (1997-98), महेंद्रसिंह धोनी (2007) आणि विराट कोहली (2018) यांना याआधी हा सन्मान देण्यात आला आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी गठित निवड समितीत माजी क्रिकेटर विरेंद्र सहवाग आणि माजी हॉकी कर्णधार सरदार सिंह यांचा समावेश आहे.

33 वर्षीय रोहित शर्मा सध्या टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. मुंबईकर रोहितचा जन्म नागपूरचा, तर बालपण बोरिवलीत गेले. 2006 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. डिसेंबर 2009 मध्ये त्याने रणजी करंडक स्पर्धेत त्याने गुजरातविरुद्ध कारकीर्दीतील सर्वाधिक 309 धावा (नाबाद) ठोकल्या होत्या.

2 फेब्रुवारी 2020 पर्यंत, रोहित शर्माने 364 आंतरराष्ट्रीय सामने खेळले (32 कसोटी, 224 एकदिवसीय, 108 टी20) आहेत. यामध्ये 39 शतके (6 कसोटी, 29 एकदिवसीय, 4 टी20) समाविष्ट आहेत.

रोहित शर्मा याला उत्कृष्ट फलंदाजीसाठी पुरस्कार देण्यात आला आहे. तर कुस्तीपटू विनेश फोगाटला 2018 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक आणि 2019 च्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेचे कांस्यपदक जिंकल्याने या पुरस्काराची मानकरी ठरली.

पॅरा अॅथलीट मरियप्पन थंगवेलू हिने 2016 ला रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तर मनिका बन्ना हिने 2018 मध्ये उत्कृष्ट खेळासाठी पुरस्कार मिळाला आहे. तिला कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक आणि आशियाई खेळात कांस्यपदक जिंकले होते.

यंदा राष्ट्रीय पुरस्काराचा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल होण्याची शक्यता आहे. या पुरस्काराचे विजेते लॉग इन करत 29 ऑगस्टला या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. दरवर्षी हा सोहळा राष्ट्रपती भवनात होतो. (Rajiv Gandhi Khel Ratna Award declare)

संबंधित बातम्या :

रोहित शर्माची ‘खेलरत्न’साठी शिफारस, चौथा क्रिकेटपटू ठरणार

‘धोनीने ठोकलेला षटकार जिथे पडला, ते वानखेडेतील आसन राखीव ठेवा’, MCA कडे विश्वस्तांची मागणी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI