Rinku Singh : रिंकू सिंहवर हा अन्याय का? इतकी शतकं ठोकूनही टेस्टसाठी का विचार होत नाही?
Rinku Singh in Ranji Trophy : देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करणं, परफॉर्म करणं हा राष्ट्रीय संघातील निवडीमागचा निकष आहे. रिंकू सिंह हे सर्व करतोय, मग त्याच्यावर अन्याय का? हा प्रश्न निर्माण होतो. रिंकू सिंहने 9 वर्षांपूर्वी 2016 साली फर्स्ट क्लासमध्ये डेब्यु केलेला.

Rinku Singh Century in Ranji Trophy : एकाबाजूला टीम इंडिया मायदेशात खेळताना अपयशी ठरत आहे. तेच दुसऱ्याबाजूला रिंकू सिंह सारख्या खेळाडूंकडे दुर्लक्ष करुन मोठी चूक करत आहेत. रिंकू सिंह फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर रचतोय. शतक ठोकून भारताकडून टेस्टमध्ये संधी मिळावी या प्रतिक्षेत आहे. रिंकू सिंह धावा करतोय, शतकं झळकवतोय इतकचं नाही, तर त्याची बॅटिंग सरासरी सुद्धा चांगली आहे. 9 वर्षांपूर्वी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यु करणाऱ्या रिंकू सिंहची बॅटिंग सरासरी आता 60 च्या आसपास पोहोचली आहे. रिंकूने 9 वर्ष रेड बॉल क्रिकेटमध्ये किती शतकं ठोकली आहेत? किती धावा केल्यात? यावर आम्ही बोलणारच आहोत. पण सध्या तो ज्या शतकामुळे आणि इनिंगमुळे चर्चेत आहे, त्या बद्दल बोलू. डावखुऱ्या रिंकू सिंहने ही शतकी खेळी तामिळनाडू विरुद्ध केली आहे.
तामिळनाडूने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 455 धावा केल्या. उत्तर प्रदेशची निम्मी टीम स्कोरबोर्डवर 200 धावा लागण्याआधीच तंबूत परतलेली. एक चांगली बाब म्हणजे रिंकू सिंहने त्यावेळी एक बाजू लावून धरलेली. त्याने शतक ठोकलं. रिंकू सिंहच्या शतकाचा परिणाम असा झाला की, तामिळनाडू विरुद्ध उत्तर प्रदेश टीम अजूनही मॅचमध्ये आहे. अपेक्षा संपलेल्या नाहीत.
9 वर्षात इतक्या धावा, इतकी शतकं
रिंकू सिंहने 9 वर्षांपूर्वी 2016 साली फर्स्ट क्लासमध्ये डेब्यु केलेला. तेव्हापासून रेड बॉल क्रिकेटमध्ये रिंकूने आतापर्यंत 9 शतकं झळकावली आहेत. म्हणजे तामिळनाडू विरुद्ध त्याने झळकावलेलं शतक फर्स्ट क्लास करिअरमधील नववी सेंच्युरी आहे. या 9 शतकांसह रिंकू सिंहने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 3500 धावा 60 म्हणजे 59.07 च्या सरासरीने बनवल्या आहेत.
मग, रिंकू सिंहवर अन्याय नाही का?
सरासरीने रिंकू सिंहने फर्स्ट क्लाक क्रिकेटमध्ये दरवर्षी एक शतक झळकावलं आहे. त्याची सरासरी 60 आहे. मग, भारतीय टीम मॅनेजमेंट रिंकूकडे दुर्लक्ष कसं करु शकते?. तो भारतासाठी टेस्ट का खेळू शकत नाही? देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करणं, परफॉर्म करणं हा राष्ट्रीय संघातील निवडीमागचा निकष आहे. रिंकू सिंह हे सर्व करतोय, मग त्याच्यावर अन्याय का? हा प्रश्न निर्माण होतो.
