AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs IRE: ‘IPL मुळे आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाने मालिका गमावली’ माजी खेळाडू असं का म्हणाला?

भारत आणि आयर्लंड यांच्यात टी-20 मालिका रंगली असून या मालिका आयर्लंडने जिंकली. आता यानंतर भारतीय संघाने ही मालिका का गमावली यामागील कारणे माजी खेळाडूने स्पष्टपणे मांडले आहेत.

IND vs IRE: 'IPL मुळे आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाने मालिका गमावली' माजी खेळाडू असं का म्हणाला?
ind vs ire
| Updated on: Jun 29, 2026 | 12:57 PM
Share

आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय क्रिकेट संघाच्या झालेल्या ऐतिहासिक 0-2 पराभवाने सर्वांना धक्का बसला आहे. विश्वविजेते बनल्यानंतर इतक्या लवकर एका दुबळ्या संघासमोर या तरुण संघाच्या झालेल्या पराभवावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाची पहिलीच टी-20 मालिका होती आणि त्याला ती जिंकता आलेली नाही. आता यानंतर कोच गौतम गंभीरवर पण बरीच टीका झाली. भारतीय संघ इतका मजबूत असूनही आयर्लंडविरुद्ध संघाकडून पराभव पत्कारायची वेळ का आली. आता भारतीय संघाचे नेमके कुठे चुकले याबद्दल आता भारताच्या माजी खेळाडूने एक विधान केले आहे.

या दारुण पराभवानंतर, भारताचा अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने भारतीय फलंदाजांना आरसा दाखवला आहे. अश्विनच्या मते, “आयपीएलच्या सपाट आणि फलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्ट्यांवर खेळण्याची सवय असलेल्या तरुण खेळाडूंची खरी कसोटी अशा परिस्थितीत लागते. प्रत्येक आंतरराष्ट्रीय खेळपट्टी आयपीएलइतकी सोपी नसते. आयपीएलमध्ये दिसणाऱ्या ’24-कॅरेट’ सपाट खेळपट्ट्या आयर्लंडमध्ये उपलब्ध नव्हत्या. खरं सांगायचं तर, या मालिकेतील क्रिकेटचा दर्जा पाहून मला खूप आनंद झाला,” असे तो म्हणाला.

अश्विनने पुढे असेही सांगितले की,”या भारतीय फलंदाजी फळीतील बहुतेक खेळाडू थेट आयपीएल खेळून येथे आले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे खरे मूल्य आणि क्षमता अशा खेळपट्ट्यांवर खेळल्यावरच तपासली जाईल. यात शंका नाही की आयपीएलमधील सहभागामुळे भारतीय फलंदाजांनी आपली फटकेबाजी आणि स्ट्रोक-प्लेमध्ये लक्षणीय सुधारणा केली आहे, पण जेव्हा चेंडू स्विंग होतो आणि वळतो, तेव्हा त्यांना संघर्ष करावा लागतो.”

दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय फलंदाज अपयशी ठरले. आयर्लंडविरुद्धच्या या मालिकेत भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. पहिल्या टी-20मध्ये 183 धावांचे लक्ष्य गाठताना कर्णधार श्रेयस अय्यर, संजू सॅमसन आणि इशान किशनसारखे स्टार खेळाडू पूर्णपणे अपयशी ठरले आणि संघ 148 धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या सामन्यातही आयर्लंडच्या गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये 39 धावांत चार बळी घेतले. तिलक वर्माच्या अर्धशतकानंतरही, 154 धावांचे माफक लक्ष्य समोर असताना भारतीय संघ एका धावेने सामना हरला.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...