IPL 2025 : IPL फायनल हरल्यावर प्रीति झिंटाचं किती कोटींचं नुकसान ?
IPL 2025 Preity Zinta Loss: प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्जने काल आयपीएलचा अंतिम सामना गमावला. पराभवामुळे खेळाडूंप्रमाणेच प्रीतीच्या चेहऱ्यावरही दुःख स्पष्टपणे दिसून येत होते. पंजाब हरल्यामुळे प्रीतीचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे.

IPL 2025 Preity Zinta Loss : मंगळवारी आयपीएल 2025 चा अंतिम सामना सगळ्यांच्याच लक्षात राहील असा झाला. आरसीबीने पंजाबचा 6 धावांनी पराबव करत तब्बल 18 वर्षांनी आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. मात्र प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्ज या संघाला दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब किंग्जच्या पराभवानंतर प्रीती झिंटा खूप दुःखी होती. एकीकडे विजयानंतर आरसीबीला कोट्यावधी रुपये मिळणार आहेत, पण प्रीती झिंटाचं मात्र करोडोंचं नुकसान झालंय.
आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर प्रत्येक संघाचं कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. आरसीबीवर पैशांचा पाऊस पडलाय. कालच्या विजयानंतर विराट कोहलीसह संघातील प्रत्येक खेळाडू आनंदाने नाचत होता. तर पंजाब किंग्जचे खेळाडू पराभवामुळ खूपच दु:खी आणि निराश होते.
प्रीती झिंटाचं कोट्यवधींचे नुकसान
आयपीएल फायनल जिंकणाऱ्या संघाला 20 कोटींची रक्कम बक्षीस म्हणून मिळतं. तर उपविजेत्या संघाला 13 कोटी मिळतात. आरसीबीला 20 कोटी आणि प्रितीच्या संघाला फक्त 13 कोटी मिळाले. जर पंजाब किंग्ज ही फायनल मॅच जिंकला असता तर त्यांना 20 कोटींची बक्षीस रक्कम मिळाली असती. ज्यामुळे प्रीती झिंटाला कोट्यवधींचा नफा झाला असता. पण आता सामना हरल्यानंतर तिला कोट्यवधींचा तोटा झाला आहे.
दरम्यान आयपीएलसाठी पात्र ठरणाऱ्या संघालाही बक्षीस दिले जाते. मुंबई इंडियन्सला 7 कोटी मिळाले तर गुजरात टायटन्सला चौथ्या क्रमांकावर राहिल्याबद्दल 6.5 कोटी मिळाले.
प्रीतीची रिॲक्शन व्हायरल
आयपीएलचा अंतिम सामना हरल्यानंतर प्रीती झिंटाची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ती खूप दुःखी दिसत होती. मात्र तिच्या संघाचं सांत्वन करण्यासाठी ती मैदानातही आली होती. ती श्रेयस अय्यरची पाठ थोपटताना दिसली. प्रीतीच्या प्रतिक्रियेवर लोक कमेंट करत आहेत. एकाने लिहिलं- ‘मी आयपीएल पाहतही नाही, पण तरीही पंजाब किंग्ज जिंकावे अशी माझी इच्छा होती… फक्त प्रितीचे हास्य पाहण्यासाठी’ तर – ‘प्रिती झिंटा आयपीएल 2025 चा अंतिम सामना जिंकणं डिझर्व्ह करते’ असं दुसऱ्याने लिहिलं.
