AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेट चाहत्यांची एक फर्माईश आणि डेविड वॉर्नर केलं असं, Video पाहून तुम्हीही खूश व्हाल

डेविड वॉर्नरचे भारतातही बरेच चाहते आहेत. याची प्रचिती नागपूर कसोटी सामन्यावेळी आली. एका चाहत्याने ओरडून ओरडून एक फर्माईश केली आणि त्यानेही नकार दिला नाही. वॉर्नरने ती फर्माईश पूर्ण केली.

क्रिकेट चाहत्यांची एक फर्माईश आणि डेविड वॉर्नर केलं असं, Video पाहून तुम्हीही खूश व्हाल
नागपूर कसोटीत डेविड वॉर्नरनं चाहत्यांचं ऐकलं आणि त्याला हवं होतं तसंच केल, पाहा VideoImage Credit source: Twitter
| Updated on: Feb 15, 2023 | 6:06 PM
Share

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये पार पडला. हा सामना भारताने एक डाव आणि 132 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी ही मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे. ही मालिका भारताला 3-0 ने जिंकणं गरजेचं आहे. तर ऑस्ट्रेलियन संघाने अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. असं असताना ट्विटरवर ऑस्ट्रेलियन बॅटर डेविड वॉर्नरचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे.भारतीय चित्रपटाचं वेड पार सातासमुद्रापलीकडे गेल्याचं आपण यापूर्वी पाहिलं आहे.या व्हिडीओत भारतीय चाहत्यांनी डेविड वॉर्नरकडे एक फर्माईश केली. ती फर्माईश डेविड वॉर्नर याने पूर्णही केली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत डेविड वॉर्नर पुष्पा चित्रपटातील सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहे.

यापूर्वी डेविड वॉर्नर याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या चित्रपटातील सीन करत व्हि़डीओ पोस्ट केला होता. पुष्पा चित्रपटातील डॉयलॉगमध्ये डेविड वॉर्नरसह त्याची मुलंही दिसली होती. हा व्हिडीओ चाहत्यांनी अक्षरश:डोक्यावर घेतला होता.आता तीच मागणी नागपूरमध्ये चाहत्यांनी केली आणि त्याने पूर्ण देखील केली. पुष्पा नाम सुनके फूल समझे क्या? फूल नहीं, आग है मैं, झुकूंगा नहीं…

डेविड वॉर्नरची पहिल्या कसोटीतील खेळी

पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन सलामी फलंदाज डेविड वॉर्नरची बॅट हवी तशी चालली नाही. पहिल्या डावात अवघी एक धाव करून डेविड तंबूत परतला. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला. त्यानंतर दुसऱ्या डावात अवघ्या 10 धावांवर समाधान मानावं लागलं. आर. अश्विनच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला.

डेविड वॉर्नरची क्रिकेट कारकिर्द

डेविड वॉर्नर आतापर्यंत 102 कसोटी सामने खेळला आहे. या कसोटी सामन्यात 25 शतकं आणि 34 अर्धशतकं झळकावली आहेत. नाबाद 335 ही सर्वोत्तम खेळी राहिली आहे. डेवि़ड वॉर्नरनं 8143 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजीत एकूण 4 गडी बाद केले आहेत. वनडे क्रिकेट कारकिर्दीत एकूण 141 सामने खेळला आहे. 19 शतकं आणि 27 अर्धशतकांच्या जोरावर 6007 धावा केल्या आहेत. तर 179 ही वनडेतील सर्वोत्तम खेळी आहे. त्याचबरोबर 99 टी 20 सामने खेळला आहे. या खेळात 1 शतक आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 100 ही सर्वोत्तम खेळी आहे. टी 20 स्पर्धेत डेविड वॉर्नरनं 2894 धावा केल्या आहेत.

विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका.
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती.