Rishabh Pant Update : मोठी अपडेट ! दुखापतीमुळे ऋषभ पंत इंग्लंड कसोटीतून बाहेर, कोण घेणार त्याची जागा ?

Rishabh Pant Update : टीम इंडियाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंत हा इंग्लंडविरुद्ध सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तो कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. मात्र, अद्याप याची पुष्टी झालेली नाही. आता त्याच्या जागी संघात कोणाचा समावेश होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Rishabh Pant Update : मोठी अपडेट !  दुखापतीमुळे ऋषभ पंत इंग्लंड कसोटीतून बाहेर, कोण घेणार त्याची जागा ?
ऋषभ पंतच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jul 24, 2025 | 2:51 PM

मँचेस्टर येथे सुरू असलेल्या कसोटीत टीम इंडियाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे बाहेर पडल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सचा एक चेंडू पंतच्या बुटावर लागला, त्यामुळे तो वेदनेने ओरडू लागला. त्याला ताबडतोब मैदानाबाहेर काढण्यात आले. आता त्याच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. त्यानुसार, पंतच्या पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालं असून त्याला 6 आठवडे आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे टीम इंडियाच्या अडचणी खूप वाढल्या आहेत आणि आता त्यांना मँचेस्टर कसोटी सामन्यात फक्त 9 फलंदाजांसह मैदानात उतरावे लागेल. रिपोर्ट्सनुसार, पाचव्या कसोटी सामन्यासाठी यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन संघात परतू शकतो. तो गेल्या दोन वर्षांपासून संघाबाहेर आहे.

6 आठवड्यांसाठी पंत बाहेर ?

मँचेस्टर कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी, ऋषभ पंत क्रिस वोक्सच्या चेंडूवर रिव्हर्स शॉट खेळण्यासाठी गेला, पण तो चुकला आणि चेंडू थेट त्याच्या बुटावर लागला. यामुळे तो वेदनेने ओरडू लागला. त्याला ताबडतोब मैदानाबाहेर काढण्यात आले. पंतने त्यावेळी 48 चेंडूत 37 काढून नाबाद खेळत होता. जखमी झाल्यावर मैदानातून बाहेर नेल्यावर पंतच्या पायाचे स्कॅनिंग करण्यात आले. आणि त्याच्या पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचे तेव्हा त्यात दिसून आलं. यानंतर ऋषभ पंत याला 6 आठवड्यांसाठी आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Rishabh Pant Injury Update : जखमी ऋषभ पंतबद्दल मोठी अपडेट ! टेस्ट सीरीजमधून पडणार बाहेर ?

या मालिकेत ऋषभ पंतने आतापर्यंत दोन शतके आणि दोन अर्धशतक ठोठावली असून एकूण 462 धावा केल्या आहेत. मात्र आता त्याच ऋषभ पंतला संघातून वगळल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता पाचव्या कसोटी सामन्यासाठी ऋषभ पंतच्या जागी, यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे.

इशान किशनची होणार एंट्री

गेल्या दोन वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर असलेला यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन याला ऋषभ पंतच्या जागी पाचव्या कसोटी सामन्यासाठी संघात समाविष्ट केले जाऊ शकते. तो जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. इशान किशनने आतापर्यंत 2 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 3 डावांमध्ये एका अर्धशतकाच्या मदतीने 78 धावा केल्या आहेत. या हंगामात इशान किशन हा नॉटिंगहॅमशायरकडून काउंटी क्रिकेट खेळला. त्याने दोन सामन्यांमध्ये दोन अर्धशतके झळकावली. कदाचित यामुळेच तो टीम इंडियामध्ये पुनरागमन करत आहे.