AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्मा आणि रितिका यांच्या लव्हस्टोरीत युवराज सिंग ठरला विलन! काय झालं होतं पहिल्या भेटीत

रोहित शर्मा आणि रितिका सजदेहनं एकमेकांना सहा वर्षापर्यंत डेट केलं होतं. मात्र 2015 मध्ये झालेल्या आयपीएल दरम्यान सिक्रेट रिलेशन जगासमोर आलं. मिस्ट्री गर्ल दुसरी तिसरी कुणी नसून रितिका होती.

रोहित शर्मा आणि रितिका यांच्या लव्हस्टोरीत युवराज सिंग ठरला विलन! काय झालं होतं पहिल्या भेटीत
रोहित शर्मा आणि रितिका यांच्या लव्हस्टोरीत युवराज सिंग ठरला विलन! (Photo-Instagram)
| Updated on: Feb 04, 2023 | 9:52 PM
Share

मुंबई: रुपेरी पडद्यावरील प्रेमकथेप्रमाणेच काही क्रिकेटपटूंच्या लव्हस्टोरीज आहे. अशीच काहीसी लव्हस्टोरी भारतीय क्रिकेट संघाचा हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) यांची आहे. रितिका सजदेह ही सिक्सर किंग युवराज सिंगची बहीण आहे. एका जाहिरातीच्या शूटींग दरम्यान युवराजनं रोहित शर्माला दमही दिला होता. मात्र एखाद्या फिल्मी स्टोरीसारखी दोघांची प्रेम कहाणी फुलली. एका रोमँटिक प्रपोजनंतर रोहित शर्मा आणि रितिका यांनी 3 मे 2015 रोजी साखरपुडा केला. त्यानंतर 13 डिसेंबर 2015 रोजी दोघं लग्नबंधनात अडकले. रोहित आणि रितिकाचं लग्न मोठ्या थाटामाटात ताज लँड हॉटेलमध्ये पार पडलं. या लग्न सोहळ्याला क्रिकेट आणि बॉलिवूडमधील सेलेब्रिटी सहभागी झाले होते. मात्र हे लग्न कसं ठरलं याबाबत स्वत: रोहित शर्मा याने खुलासा केला आहे.

पहिल्या भेटीत नेमकं काय झालं होतं?

‘आम्ही एक शूट करत होतो तेव्हा मी 20 वर्षांचा होतो. मला काहीच कल्पना नव्हती. युवराज आणि इरफान सुद्धा शूटसाठी आले होते. मी युवीला भेटण्यासाठी त्याच्या सेटवर गेलो. सिनिअर प्लेयर होते म्हणून त्यांना पहिलं भेटणं आवश्यक असतं. मी त्यांना भेटलो आणि विचारपूस केली. रितीका तिथे बसली होती. युवी काय बोलायच्या आतच सांगितलं. ही माझी बहीण आहे हिच्याकडे बघू सुद्धा नकोस. मी सांगितलं युवी भाई, मी तुला भेटायला आलो आहे. त्यानंतर पूर्ण शूटमध्ये मी रितीकाला रागानेच बघत होतो. ही कोण आहे यार, हीला इतका काय घमंड आहे.’ असं रोहित शर्माने एका मुलाखतीत सांगितलं.

पहिल्यांदा कोण बोलायला आलं?

‘माझं शूट आलं तेव्हा काय करायचं कळत नव्हतं. तेव्हा मी नर्व्हस झालो होतो. मी कॅमेरा कसा फेस करणार, बरोबर बोलेन की नाही वगैरे वगैरे. काही डायलॉग दिले होते ते बोलण्याचा मी प्रयत्न केला. सर्वकाही व्यवस्थित झालं पण नंतर डायरेक्टर आला आणि बोलला. तुमचा माईक बंद होता म्हणून आम्ही काही रेकॉर्ड करू शकलो नाही. पुन्हा एकदा करावं लागेल. मग त्याच अवस्थेत खाली गेलो तेव्हा रितीका तिथे होती. तिने प्रेमाने येऊन विचारलं की काय हवं असेल तर मला सांग. ही आमची पहिली भेट होती. नंतर आम्ही चांगले मित्र झालो. त्यानंतर आम्ही आणखी शूटसाठी एकत्र आलो. त्यानंतर नातं आणखी घट्ट होत गेलं. त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.’, असं रोहित शर्माने पुढे सांगितलं.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.