
Rohit Sharma on T20 World Cup 2026: टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. त्यानंतर रोहित शर्मा याने या फॉर्म्यटमध्ये निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर लागलीच विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनीही निवृत्तीची घोषणा केल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. क्रिकेट जगतातील राजकारणावर तुफान चर्चा झाली. तर आता टी 20 विश्वचषक 2026 ची सुरुवात होत आहे. अशावेळी माजी कर्णधार रोहित शर्मा याने महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. रोहित शर्माने या सामन्यांविषयी मत व्यक्त केले आहे. त्याच्यासाठी ही वेळ अजब असेल. त्याला आता घरात बसून टी20 विश्वचषक पाहावा लागेल, अशा भावना त्याने व्यक्त केल्या. जेव्हापासून टी20 विश्वकपाची सुरुवात झाली. तो प्रत्येक हंगामात दिसला. पण यंदा त्याचे मन भरून आले आहे. कंठ दाटून आला आहे. कारण तो या विश्वचषकाचा भाग नसेल.
विश्वचषकाचा महौलच काही और
रोहित शर्मा याने त्याच्या भावना व्यक्त केल्या. भारतासाठी आता टी20 खेळत नाही याचं फारसं दुःख नाही. पण आता टी20 विश्वचषक ही वेगळी गोष्ट आहे. विश्वचषकात खेळल्याच्या आठवणी आता ऊराशी बाळगल्याचे त्याने सांगितले. येत्या विश्वचषकातील काही सामने स्टेडियममधून पाहणार असल्याचे तो म्हणाला.
माझ्यासाठी थोडं अजब असेल
माझ्यासाठी या टी20 विश्वचषकात न खेळणं हे थोडं अजब असेल. कारण यातील अनेक सामने मी घरात बसून पाहिल. जेव्हा मी टी20 खेळायला सुरूवात केली. तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक विश्वचषक संघात मी होतो. त्यामुळे यंदा मला थोडं वेगळं आणि अजब वाटत आहे. मी जेव्हा टी20 सामने पाहतो, तेव्हा मला असं काही वाटत नाही. पण हा विश्वचषक आहे आणि हे वातावरण काही औरच असतं असे रोहित म्हणाला.
क्रिकेटमध्ये संवाद होणे गरजेचे
यावेळी क्रिकेटमध्ये सांघीक संवादावर आणि खेळाडूंमधील संवादांवर रोहित शर्माने याने जोर दिला. संघात संवाद असणे आवश्यक असल्याचे रोहित म्हणाला. वर्ष 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीत मोहम्मद सिराज याला वगळण्यात आले होते. पण मी तिथे गेलो आणि व्यवस्थापनाला समजावलं. 2023 मध्ये विश्वचषकावेळी युजवेंद्र चहलसोबतही असंच काहीसं झालं होतं, असे त्यानं सांगितलं.रोहित म्हणाला की सिराज हा 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीत नव्हता. पण खेळाडूंशी तुमचा संवाद असायला हवा. प्रत्येक खेळाडूशी बॉडिंग असावं. त्यामुळे संवादावर त्याने जोर दिला.