AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: सिक्स मारून विषय संपव… ड्रेसिंग रूममधून रोहितचा इशारा आणि विराटने पूर्ण केली इच्छा , Video पाहिलात का ?

Champions Trophy IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 242 धावांचं आव्हान टीम इंडियाने सहज पार केलं आणि 6 गडी राखून विजय मिळवला. विराट कोहलीच्या नाबाद 100* धावांनी (111 बॉल, 7 चौकार) भारताचा विजय सुकर केला. त्यामुळे सेमीफायनलमध्ये भारताची एंट्री ऑलमोस्ट पक्की झाली. विजयाच्या समीप आल्यावर भारताला अवघ्या 4 धावा हव्या असताना विराट कोहली 96 धावांवर खेळत होता, त्यावेळी ड्रेसिंग रूममधून रोहित शर्माने हातवारे करत त्याला खास इशारा दिला. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

IND vs PAK: सिक्स मारून विषय संपव... ड्रेसिंग रूममधून रोहितचा इशारा आणि विराटने पूर्ण केली इच्छा , Video पाहिलात का ?
रोहितने केला विराटला सिक्स मारण्याचा इशाराImage Credit source: social
| Updated on: Feb 24, 2025 | 9:17 AM
Share

गेल्या बऱ्याच काळापासून फॉर्मशी झुंजणाऱ्या विराट कोहलीने पुन्हा फॉर्ममध्ये येण्यासाठी आपला आवडता संघ पाकिस्तान निवडला. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दुबईतील स्टेडिअममध्ये पाकिस्तानिविरुद्धच्या सामन्यात ‘चेस मास्टर’विराटने 111 चेंडूत 100 धावांची नाबाद खेळी केली आणि भारतावर सहा गडी राखून विजय तर मिळवून दिलाच पण सेमी फायनलमध्येही नाव ऑलमोस्ट फायनल केलं. मात्र सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये जिंकण्यासाठी कमी धावा हव्या असल्यामुळे विराटचे शतक हुकतं की काय अशी भीती प्रत्येकाच्या मनात होती.

विराटच्या शतकावर सस्पेन्स

43वे षटक सुरू झाले तेव्हा भारताला विजयासाठी चार धावा आणि विराट कोहलीला शतकासाठी पाच धावांची गरज होती. फिरकीपटू खुशदिल शाहच्या पहिल्याच चेंडूवर एकेरी घेत विराटने हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे केले. पण पुढच्याच चेंडूवर अक्षर पटेलने सिंगल घेत विराट कोहलीला स्ट्राईक परत दिला. त्यामुळे आता विजयासाठी फक्त दोन धावा आणि विराटला शतकासाठी चार धावा हव्या, असे समीकरण झालं होतं.

कोहलीच्या शतकासाठी रोहित अधीर

याचवेळी स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. खुद्द विराटलाही माहीत होते की, शतकं काही दररोज होत नाहीत. तोही या शतकाची आतुरतेने वाट पाहत होता. पण या शतकासाठी तो एकटाच अधीर नव्हता. पॅव्हेलियनमध्ये उपस्थित कर्णधार रोहित शर्माही तितकाच बेचैन होता. त्याचवेळीन कॅमेरामनने त्याच्यावर कमेरा फोकस केला तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या रोहितने विराटला शानदार सिक्स मारत शतक पूर्ण करण्याचा इशारा दिला.

चौकार फटकावत विराटने पूर्ण केली इच्छा

त्यानंतर विराट कोहलीने 43व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर खुशदिल शाहच्या बॉलवर विजयी चौकार मारून भारताला तर विजय मिळवून दिलाच शिवाय त्याने वनडेतील आपलं 51वं शतकही पूर्ण केलं. या शानदार शतकाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता. त्यानंतर त्याने पॅव्हेलियनकडे इशारा केला आणि म्हणाला… मी बोलले होतो.. मैं हूं ना.. रिलॅक्स ! ते पाहून रोहितच्या चेहऱ्यावरही हास्य विलसलं. त्या दोघांच्या इशारेबाजीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Follow Us
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर