Virat Kohli : रोहित आणि गेलपैकी सर्वोत्तम कोण? विराटने कुणाचं नाव घेतलं?
विराट कोहली याने टी 20 क्रिकेटमधील रोहित शर्मा आणि ख्रिस गेल या दोघांपैकी कोणता फलंदाज हा सर्वोत्तम ओपनर आहे? या प्रश्नावर काय उत्तर दिलं? जाणून घ्या.

रोहित शर्मा आणि ख्रिस गेल हे क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम आजी माजी फलंदाजांपैकी एक आहे. क्रिकेट विश्वात विशेष करुन टी 20 फॉर्मटेमध्ये कायमच सर्वोत्तम फलंदाज/गोलंदाज कोण? याची चर्चा पाहायला मिळते. भारतीय चाहत्यांना रोहित शर्मा हा सरस फलंदाज वाटतो. तर काहींना ख्रिस गेल हा रोहितपेक्षा भारी वाटतो. मात्र ही क्रिकेट चाहत्यांची मतं झाली. मात्र टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याने रोहित आणि गिलपैकी सर्वोत्तम फलंदाज कोण? या प्रश्नाचं काय उत्तर दिलं? याबाबत आपण जाणून घेऊयात. विराटला टी 20 क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीवीर फलंदाज कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. विराटने टी 20 क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज कोण? या प्रश्नावर फार वेळ न घेता ख्रिस गेल असं उत्तर दिलं.
