Rohit Sharma Retirement : रोहित शर्माच्या निवृत्त होतोय ? गौतम गंभीरने दिले मोठे अपडेट, Video समोर
Gambhir reveals Rohit Retirement Plan : भारताचा नामवंत खेळाडू रोहित शर्माच्या निवृत्तीबद्दल मोठी अपडेट आली आहे. याबद्दलचा एक व्हिडीओ समोर आला आहे. नेमकं काय आहे त्यात ? जाणून घेऊया.

Gautam Gambhir on Rohit Sharma Retirement : कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्मा याच्या निवृत्तीबद्दल विविध चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेच. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यात येणारी मालिकी ही त्याची शेवटची सीरिज असेल का ? असाही सवाल चाहत्यांच्या मनात घोळत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच रोहित त्याची फेअरवेल मॅच खेळेल का ? अशीही चर्चा सुरू आहे.
प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्यामनात हेच सवाल आहे. मात्र यामागचं सत्य नेमकं काय आहे, हे आता समोर आलं आहे. रोहित शर्मा आणि टीम इंडियाचे कोच गौतम गंभीर यांचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यातून रोहितच्या निवृत्तीबाबत खुलासा झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्या दोघांसह टीम इंडियाचा सध्याचा कॅप्टन शुबमन गिल हाही दिसला.
व्हायरल व्हिडीओमुळे निवृत्तीबद्दल खुलासा
आता प्रश्न असा आहे की, त्या व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे? त्यातून रोहित शर्माच्या निवृत्तीचा खुलासा होऊ शकतो का ? रोहित शर्मा आता निवृत्त होईल की नंतर, हे त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे. आणि ती माहिती देणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आहेत.
हा व्हिडीओ ॲडलेडमधील टीम हॉटेलमधील असल्याचे समजते, त्यामध्ये टीम इंडियाचे खेळाडू सामना खेळल्यानंतर हॉटेलमध्ये परतताना दिसत आहेत. याच दरम्यान, हॉटेलच्या लॉबीमध्ये, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने पुढे चालत असलेल्या रोहित शर्माला त्याचा फोटो लावण्यास सांगितले. कारण, सर्वांना वाटत होतं की हा त्याचा निरोपाचा सामना आहे. एक फोटो तर लाव ना असं गंभीरच्या आवाजात ऐकू येतं.
त्याचं बोलणं ऐकून रोहित शर्मा मागे वळून गौतम गंभीरकडे पाहतो. पण त्याच्या चेहऱ्यावर तर हास्य होतं. एवढंच नव्हे तर त्याच्यासोबत शुबमन गिलही चालत होता, तोही हे सगळं ऐकून हसत होता.
View this post on Instagram
रोहित शर्माची इतक्यात निवृत्ती नाही !
समोर आलेला व्हिडीओ पाहून चाहत्यांना नक्कीच दिलासा मिळाला असेल की रोहित शर्मा इतक्यात तरी निवृत्त होणार नाही. फिटनेस वाढवून रोहित ऑस्ट्रेलियात पोहोचला. पहिल्या कसोटीत अपयशी ठरला असला तरी काल, ॲडलेडमधील वनडेमध्ये त्याने तूफान बॅटिंग करत उत्तम परफॉर्मन्स दिला. त्यामुळे पुढेही तो असाच खेळत राहील अशी अपेक्षा चाहत्यांना आहे आणि येत्या काळात ती नक्की पूर्ण होईल असा विश्वासही आहे.
