RR vs PBKS Playing 11 IPL 2021: विराटच्या खास माणसाचा आज डेब्यू तर पंजाबकडून खेळणार शाहरुख खान, वाचा दोन्ही संघाची प्लेईंग 11!

RR vs PBKS Playing 11 IPL 2021: विराटच्या खास माणसाचा आज डेब्यू तर पंजाबकडून खेळणार शाहरुख खान, वाचा दोन्ही संघाची प्लेईंग 11!
RR vs PBKS

RR vs PBKS Playing 11 IPL 2021 : प्रिती झिंटाच्या मालकीच्या असलेल्या पंजाब संघाकडून खेळताना आज शाहरुख खान दिसणार आहे. तर पाठीमागच्या मोसमापर्यंत विराटसाठी लढणारा खेळाडू आज राजस्थानकडून खेळणार आहे.

Akshay Adhav

|

Apr 12, 2021 | 2:38 PM

मुंबई :  आयपीएलच्या 14 व्या पर्वातील चौथा सामना आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज (Rajasthan Royals vs punjab Kings) यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium Mumbai) खेळविला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी पाठीमागील मोसम अतिशय खराब गेला. पॉवर प्ले मध्ये दोन्ही संघांच्या गोलंदाजांचे इकोनॉमी रेट जास्त होता. पंजाब संघ मागील मोसमात गुणतालिकेत 6 नंबरला बोता तर राजस्थान संघ अगदी तळाशी होता. मात्र हा सगळा भूतकाळ आहे. आयपीएल 2020 ते आयपीएल 2021 यादरम्यान पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. दोन्ही संघाची बलस्थाने आणि विक पॉइंट बदललेले आहेत. अशा परिस्थितीत आज दोन्ही संघाचा आयपीएल 2021 मधला पहिला सलामीचा सामना होतोय. या सामन्यात दोन्ही संघांच्या प्लेईंग 11 काय असेल, याची मोठी उत्सुकता असणार आहे. (RR vs PBKS Playing 11 IPL 2021 Rajasthan Royals vs punjab Kings teams player to Watch For Ipl Match In Marathi)

जिंकण्याच्या दिशेने पहिला प्रवास म्हणजे प्लेईंग 11

यंदाच्या मोसमात शानदार कामगिरी करायची असेल तर मोसमाची सुरुवात जोरदार व्हायला हवी. आज दोन्ही संघ शानदार सुरुवातीसाठी प्रयत्न करतील. त्यासाठी अचूक प्लेईंग 11 निवडणं, हा त्यांच्यासमोर मोठा टास्क असेल. दोन्ही संघात पॉवर हिटर आहे. एकाहून एक मोठे खेळाडू आहे, जे मॅच पलटण्याची क्षमता ठेवतात.

विराट कोहलीचा खास माणसाचा आज डेब्यू

आयपीएलच्या इतिहासातील सगळ्यात महागडा खेळाडू आज राजस्थाकडून खेळताना दिसणार आहे. तसंच पाठीमागच्या मोसमापर्यंत विराटसाठी लढणारा खेळाडू आज राजस्थानकडून खेळणार आहे. आम्ही तुम्हाला शिवम मावी आणि ख्रिस मॉरिस यांच्याबद्दल सांगतोय. दोन्ही खेळाडू आज राजस्थानकडून डेब्यू करतील.

पंजाबकडून खेळणार शाहरुख खान

इकडे प्रिती झिंटाच्या मालकीच्या असलेल्या पंजाब संघाकडून खेळताना आज शाहरुख खान दिसणार आहे. आम्ही अभिनेता शाहरुख खान बद्दल सांगत नाही आहोतर आम्ही सांगतोय क्रिकेटपटू शाहरुख खान याच्याबद्दल. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये कमालीचा खेळ करुन शाहरुख चर्चेत आला होता. अखेर पंजाबच्या संघाने ऑक्शनमध्ये त्याला खरेदी केलंय.

राजस्थान रॉयल्स : बेन स्टोक्स, यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, रियान पराग, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, राहुल तेवतिया, श्रेयस गोपाल, एंड्रयू टा,य जयदेव उनाडकट

पंजाब किंग्स : केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, मोजेज हेनरिक्स, शाहरुख खान, जलज सक्सेना, रिले मेरेडिथ, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी

(RR vs PBKS Playing 11 IPL 2021 Rajasthan Royals vs punjab Kings teams player to Watch For Ipl Match In Marathi)

हे ही वाचा :

IPL 2021 RR vs PBKS live streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज, सामना कधी, कुठे, केव्हा?

IPL 2021 : राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन कसं बनवणार? नवोदित कर्णधार संजू सॅमसनने सांगितला संपूर्ण प्लॅन!

IPL 2021 RR vs PBKS Head to Head Records: प्रतिस्पर्धी संघांत 21 मॅच, राजस्थान विरुद्ध पंजाब, कुणाचा पगडा भारी राहणार?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें