Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर याला अख्ख्या कारकीर्दीत नाही करता आलं, पण मुलाने घडवला तो इतिहास, अर्जुन तेंडलकरची कमाल
Arjun Sachin Tendulkar: क्रिकेट जगतातील देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला त्याच्या अख्ख्या कारकार्दीत ही गोष्ट करता आली नाही. पण नवख्या अर्जुन तेंडुलकर याने तो कारनामा करून दाखवला. त्याची सध्या क्रिकेट जगतात चर्चा सुरू आहे. कोणता आहे तो विक्रम?

Arjun Tendulkar Achievement: अर्जुन तेंडुलकर याने हा कारनामा करुन दाखवला आहे. त्याचे वडील, सचिन तेंडुलकर यांना त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत असं काही करता आलं नाही. मुंबई इंडियन्सकडून इंडियन प्रीमियर लीगमध्ये अर्जुन खेळला आहे. तो ऑलराऊंडर म्हणून ओळखल्या जातो. मध्यंतरी त्याचा बॅडपॅचही दिसला. त्याला लखनऊ सुपर जायंट्सने(LSG) त्यांच्या संघात घेतले आहे. अर्जुन हा स्थानिक क्रिकेटमध्ये गोवा संघाचे प्रतिनिधीत्व करतो. तो सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्याचा जलवा दाखवत आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत 26 वर्षीय ऑलराऊंडरने सलमीवीर म्हणून जोरदार कामगिरी बजावली. तर नवीन चेंडूवर त्याचे कौशल्य दाखवले आहे. मध्य प्रदेशविरोधातील सामन्यात अर्जुनने जोरदार कामगिरी बजावली. त्याने 4 षटकात 36 धावा दिल्या आणि 3 बळी घेतले. तर 10 चेंडूत 16 धावा केल्या. पाच सामन्यात त्याच्या नावावर 70 धावा देऊन 8 बळी घेतल्याची नोंद झाली आहे.
वडिलांपेक्षा त्याने वेगळा सूर आळवला आहे. सचिन तेंडुलकर यांच्या टी20 करिअरपेक्षा त्यांचा फॉर्म वेगळा दिसला. मास्टर ब्लास्टर टी20 संघात सलामीवीर म्हणून खेळला. पण त्याने गोलंदाजी केली नाही. सचिन तेंडुलकरने त्याच्या 96 टी20 सामन्यात केवळ 93 चेंडू टाकले आहेत आणि दोन खेळाडूंना बाद केले आहे. अर्जुन तेंडुलकरने 2022/23 या हंगामात टी20 मध्ये पदार्पण केल्यानंतर गोवा संघ जवळ केला. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये करिअरची सुरुवात शतक ठोकू केली. आता तो गोव्यासाठी तीनही फॉर्म्यटमध्ये खेळत आहे.
22 प्रथम श्रेणी सामन्यात या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने 48 फलंदाजांना तंबूत परत पाठवले. तर 620 धावा केल्या. यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या कामगिरीत 18 सामन्यांमध्ये 25 बळी आणि 10 डावात 102 धावा केल्या. त्याने टी 20 मध्ये 29 सामन्यात 35 बळी घेतले. तर 189 धावा केल्या. सचिन तेंडुलकरने टी20 करिअरमध्ये केवळ एक टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. हा सामना 2006 मध्ये खेळला गेला. तर आयपीएल 2010 मध्ये आले. त्यावेळी 618 धावा करून ऑरेंज कॅप जिंकणार तो पहिला भारतीय फलंदाज ठरला होता.
