Sachin Tendulkar | पृथ्वी शॉचं नेमकं काय चुकतंय, सचिनने सांगितलं कारण

पृथ्वीचा आयडॉल असलेला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने पृथ्वीच्या बॅटिंग टेक्निकमधील काही चुका सविस्तरपणे सांगितल्या आहेत.

Sachin Tendulkar | पृथ्वी शॉचं नेमकं काय चुकतंय, सचिनने सांगितलं कारण
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 12:02 PM

मुंबई :  टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉ चमकदार कामगिरी करण्यात अपयश ठरला. अशाच प्रकारे याअगोदरच्याही काही सामन्यात पृथ्वीची निराशाजनक कामगिरी राहिली. यामुळे सोशल मीडियावर पृथ्वी सातत्याने ट्रोल होतोय. पृथ्वीचं नेमकं काय चुकतंय की त्याच्या बॅटमधून धावा बरसत नाही, याचा उहापोह लिटिल मास्टर सुनिल गावस्कर यांनी केला होता. त्यानंतर आता पृथ्वीचा आयडॉल असलेला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने देखील पृथ्वीच्या बॅटिंग टेक्निकमधील काही चुका सविस्तरपणे सांगितल्या आहेत. (Sachin Tendulkar Explain Prithvi Shaw Batting Technique Fault)

पृथ्वी शरीरापासून दूर राहून चेंडू खेळण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच अॅडलेड टेस्टमध्ये पृथ्वी थोड्या उशिरा चेंडू खेळत असल्याचे दिसलं. पृथ्वीच्या बॅकलिफ्टबद्दल बोलताना सचिन म्हणाला की, “अशा चुका जेव्हा होतात तेव्हा फलंदाजाच्या मनात एकाच वेळी अनेक विचार सुरु असतात किंवा बॅट्समन शॉर्ट पीच बॉलची अपेक्षा ठेवत असतो किंवा त्याची वाट पाहत असतो”.

बॉल खेळत असताना पृथ्वीला आपले हात शरीराच्या जवळ ठेवणे आवश्यक आहे. त्याची बॅकलिफ्ट चौथ्या स्लिपमधून येत आहे, हे होणं अपेक्षित नाहीय. पृथ्वीची बॅट बॉलच्या दिशेने मायक्रो सेकंद जरी लेट आली तरी बॅट आणि पॅडच्यामध्ये विशिष्ट अंतर पडतं आणि साहजिकच बॉल त्याच गॅपमधून स्टम्पकडे जातो, अशी खास टिप्स सचिनने पृथ्वीला दिलीय.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पृथ्वी थोड्या उशीराने बॉलला खेळण्याचा प्रयत्न करतोय, हे माझ्या निदर्शनास आलं आहे. माझ्या म्हणण्यानुसार पृथ्वीने बॉलचा अंदाज घेऊन त्या दृष्टीने खेळण्याची तयारी करावी, असं सचिन म्हणाला,

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत पृथ्वी त्यावेळी बोल्ड झाला जेव्हा त्याचा फ्रंटफूट मूव्हमेंट ठीक नव्हती. फलंदाजासोबत त्यावेळी असं घडतं ज्यावेळी त्याच्या मनात एकापेक्षा अधिक विचार सुरु असतात किंवा तो शॉर्ट पीच बॉलची अपेक्षा करत अशतो, असं सचिन म्हणाला.

पृथ्वी गेल्या काही महिन्यांपासून निराशाजनक कामगिरी करतोय. मात्र त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंतचा प्रवास सोप्पा नव्हता. पृथ्वी पहिल्यांदा प्रकाशझोतात आला तो हॅरीस शिल्ड या शालेय स्पर्धेमुळे. ही स्पर्धा शालेय स्तरावरची होती. मात्र या स्पर्धेमुळेच पृथ्वीला घरोघरी ओळख मिळाली. पृथ्वीने या स्पर्धेत रिझवी स्प्रिंगफील्ड संघातर्फे खेळताना 546 धावांची खेळी केली. पृथ्वीने वयाच्या 14 व्या वर्षी ही कामगिरी केली. या खेळीसाठी त्याचे अनेक दिग्गज खेळाडूंकडून कौतुक करण्यात आले. यानंतर पृथ्वीने मागे वळून पाहिलं नाही.

पृथ्वीची गेल्या काही वर्षातील कामगिरी पाहता आताच्या आणि तेव्हाच्या पृथ्वीत फार अंतर आहे. मात्र पृथ्वीला लवकरात लवकर सुर गवसावा, अशा शुभेच्छा त्याच्या चाहत्याकडून देण्यात येत आहेत. यामुळे लवकरच पृथ्वीकडून ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत चांगली कामगिरी पाहायला मिळेल, अशी आशा व्यक्त करुयात.

(Sachin Tendulkar Explain Prithvi Shaw Batting Technique Fault)

हे ही वाचा :

Prithvi Shaw | मुंबईकर पृथ्वी शॉला कशाची दृष्ट लागली ?

Non Stop LIVE Update
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.