AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US T20 League | शाहरुखची टी 20 मध्ये तिसरी टीम, आता अमेरिका टी -20 लीगमध्येही मैदानात उतरणार

शाहरुख खानने आयपीएल व्यतिरिक्त याआधी कॅरिबियन प्रीमियर लीगमध्येही एक संघही विकत घेतला आहे.

US T20 League |  शाहरुखची टी 20 मध्ये तिसरी टीम, आता अमेरिका टी -20 लीगमध्येही मैदानात उतरणार
| Updated on: Dec 01, 2020 | 7:14 PM
Share

मुंबई : किंग खान शाहरुख खानच्या (Shah rukh Khan) आयपीएलमधील (IPL) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata knight Riders)आणि कॅरबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL) ट्रिनबॅगो नाईट रायडर्स असे दोन मालकीचे संघ आहेत. यानंतर शाहरुख खानने तिसऱ्या टीमचे मालकत्व घेतलं आहे. शाहरुखने लॉस एंजेलिसची फ्रँचायझीची खरेदी केली आहे. याबाबतचे वृत्त मुंबई मिररने दिलं आहे. लॉस एंजेलिस नाईट रायडर्स असं शाहरुखच्या तिसऱ्या संघाचं नाव आहे. Shah Rukh Khan bought the team for the US T20 League

आयपीएलच्या धर्तीवर अमेरिकेत यूएस टी 20 स्पर्धेचं लवकरच आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत शाहरुखचा लॉस एंजेलिस नाईट रायडर्स सहभागी होणार आहे. सूत्रांनुसार या स्पर्धेमध्ये एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. या 6 संघांची नावं सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन डीसी, डॅलस, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस आणि शिकागो या शहरांवरुन ठेवण्यात येणार आहेत.

शाहरुखच्या केकेआर आणि टीकेआर या दोन्ही संघांनी दमदार कामगिरी केली आहे. कोलकाताने आयपीएलच्या इतिहासात एकूण 2 वेळा विजेतेपदावर नाव कोरलं आहे. तसेच ट्रिनबॅगोने 4 वेळा कॅरेबियन स्पर्धा जिंकली आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमानंतर म्हणजेच मे 2020 नंतर या स्पर्धेचं आयोजन केलं जाऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शाहरुखला या नव्या संघाकडून अशाच चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

शाहरुख काय म्हणाला?

“जागतिक स्तरावर आपल्या फ्रँचायजीच्या वाढीच्या प्रयत्नात मी होतो. या स्पर्धेचं आयोजन अमेरिकेत व्हावं यासाठी मी आणि इतर आयोजक प्रयत्नशील होतो”, असं शाहरुख म्हणाला. दरम्यान शाहरुख हा ‘पठाण’ या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

आयपीएल स्पर्धेनंतर क्रिकेट विश्वात अनेक टी 20 स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. विशेष म्हणजे या टी 20 क्रिकेट स्पर्धा क्रिकेट चाहत्यांच्या पसंतीस पडल्या. या स्पर्धांना चाहत्यांनी भरभरुन प्रतिसादही दिला. दरम्यान सध्या श्रीलंकेत लंका प्रीमियर लीग स्पर्धा खेळण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

‘सोनू सर, माझाही वाढदिवस शाहरुख खान सारखा साजरा करा’, चाहत्याच्या अजब मागणीवर सोनू सूद म्हणतो….

IPL 2021 | आयपीएल संपण्यापूर्वीच नव्या मोसमाचं नियोजन, 4 महिन्यांनी पुन्हा चौकार-षटकार?

Shah Rukh Khan bought the team for the US T20 League

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.