सासऱ्याच्या ट्विटला जावयाचा छानसा रिप्लाय, म्हणतो ‘थँक्स लाला….’

नात्यांचा उलगडा करणारं ट्विट शाहिद आफ्रिदीने केलं असता जावयाने सासरा शाहिद आफ्रिदीला थँक्यू लाला म्हणत रिप्लाय दिलाय. | Shaheen Shah Afridi reply Shahid Afridi Tweet

सासऱ्याच्या ट्विटला जावयाचा छानसा रिप्लाय, म्हणतो 'थँक्स लाला....'
shaheen shah Afridi And Shahid Afridi
Akshay Adhav

|

Mar 10, 2021 | 7:18 AM

मुंबई :  पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) लवकरच सासरा होणार आहे. आफ्रिदीच्या मोठ्या मुलीचा (Aqsa Afridi) साखरपुडा पार पडणार आहे. शाहिदचा होणारा जावईही क्रिकेटपटूच आहे. शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) असं त्याचं नाव आहे. याच नात्यांचा उलगडा करणारं ट्विट शाहिद आफ्रिदीने केलं असता जावयाने सासरा शाहिद आफ्रिदीला थँक्यू लाला म्हणत रिप्लाय दिलाय. (Shaheen Shah Afridi reply Shahid Afridi Tweet)

शाहिद आफ्रिदीचं ट्विट काय?

शाहीनच्या कुटुंबाने आमच्या कुटुंबाशी संपर्क साधला. दोन्ही कुटुंबं एकमेकांच्या संपर्कात आहेत. नात्यांच्या गाठी अल्लाहच्या दारातच बांधल्या जातात. जर अल्लाहची इच्छा असेल तर हे नातेही जुळून येईल. मैदानावर आणि मैदानाबाहेरही यश मिळवण्यासाठी शाहीनबरोबर माझी प्रार्थना आहे, असं ट्विट शाहीद आफ्रिदीने केलं.

शाहिन शाह आफ्रिदीने (Shaheen Shah Afridi) सासरा शाहिद आफ्रिदीने केलेल्या ट्विटला छानसा रिप्लाय दिला आहे. आफ्रिदीने ट्विट करुन झाल्यावर काही वेळाने शाहीनने त्याच्या ट्विटला रिप्लाय केला.

जावई शाहीनचा सासऱ्याला रिप्लाय काय?

सासऱ्याला केलेल्या रिप्लायमध्ये जावई शाहीन म्हणतो, थँक्स लाला… आपण माझ्यासाठी दिलेल्या आशीर्वादासाठी आणि प्रार्थनेसाठी धन्यवाद. तुम्ही पूर्ण देशाचा गौरव आहात.

शाहीनचं हे ट्विट खूपच व्हायरल होतंय. सोशल मीडियावर सासरे-जावयाचं ट्विट लोकांना भावलं आहे. नेटकरीही त्यांच्या या ट्विटवर व्यक्त होत आहेत.

अक्सा आणि शाहिनचा साखरपुडा कधी?

शाहिद आफ्रिदीच्या मुलीचे विवाह शाहिनसोबत होणार आहे. अक्सा आणि शाहिने हे दोघे 20 वर्षाचे आहेत शाहिन क्रिकेट खेळतोय. तर अक्साचं शिक्षण सुरु आहे. त्यामुळे या दोघांचा हाय प्रोफाईल साखरपुडा 2 वर्षांच्या आतच पार पडणार आहे, याबाबतची माहिती पाकिस्तानमधील एका पत्रकाराने आपल्या ट्विटद्वारे दिली आहे. या पत्रकाराने ही माहिती दोन्ही परिवारांसोबत संवाद साधल्यानंतर दिली आहे.

साखरपुडा उशिराने का?

विशेष म्हणजे या दोन्ही कुटुंबाचं आडनाव सारखं आहे. शाहिन आणि अक्साचं वय हे सारखं आहे. दोघेही 20 वर्षीय आहेत. शाहिनच्या क्रिकेट कारकिर्दीला अवघ्या काही वर्षांपूर्वीच सुरुवात झाली आहे. शाहिनला त्याच्या क्रिकेटवर लक्ष द्यायचं आहे. तर अक्सा शिक्षण पूर्ण करायचं आहे. त्यामुळे साखरपुडा हा काही महिन्यानंतर करण्यात येणार आहे.

आफ्रिदिचा होणारा जावई कोण ?

शाहिन आफ्रिदी पाकिस्तानच्या सिनिअर टीमचा महत्वाचा गोलंदाज आहे. शाहिन आतापर्यंत एकूण 15 कसोटी, 22 एकदिवसीय आणि 21 टी सामन्यात पाकिस्तान संघातून खेळला आहे. त्याने कसोटीमध्ये 48, वनडेमध्ये 45 तर टी 20 मध्ये 24 विकेट्स घेतल्या आहेत.

(Shaheen Shah Afridi reply Shahid Afridi Tweet)

हे ही वाचा :

VIDEO | सासरा शाहिद आफ्रिदीचा त्रिफळा, तरीही जल्लोष नाही, 20 वर्षीय गोलंदाज आफ्रिदीचा जावई

Shahid Afridi | ‘हा’ स्टार गोलंदाज बनणार शाहिद आफ्रिदीचा जावई

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें