AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli: प्रॅक्टिस सेशन सुरु असताना विराट आणि गिलच का वाजलं? कोहली थेट अंगावर धावून गेला, Video Viral

Virat Kohli Fight Video: विराट कोहलीचा सरावातील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात तो प्रचंड भडकलेला दिसत आहे.

Virat Kohli: प्रॅक्टिस सेशन सुरु असताना विराट आणि गिलच का वाजलं? कोहली थेट अंगावर धावून गेला, Video Viral
| Updated on: Sep 26, 2026 | 8:14 AM
Share

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना २७ सप्टेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथे खेळला जाईल, ज्यासाठी भारतीय संघ गुरुवारपासून येथे सराव करत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये कोहली एका स्टाफ मेंबरसोबत वाद घालताना दिसत आहे. त्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात तो शुभमन गिलवर भडकलेला पाहायला मिळाला.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, विराट कोहली क्षेत्ररक्षणाच्या सरावादरम्यान रोहित शर्मा, ध्रुव जुरेल आणि केएल राहुल यांच्यासोबत उभा आहे. यावेळी तो भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफकडे जाऊन त्यांना काहीतरी सांगतो. एक स्टाफ मेंबर त्याच्याकडे बोर्ड घेऊन येतो आणि कोहली त्याकडे बोट दाखवून त्यांच्याशी वाद घालतो. असे दिसते की, क्षेत्ररक्षणादरम्यान बोर्डवर स्कोअर लिहून एक टास्क देण्यात आला आहे आणि कोहली त्याबद्दल बोलत आहे. शुभमन गिलही तिथेच होता त्यामुळे असं वाटतं होतो की तो त्यांच्यावर भडकला आहे. विराट कोहली क्षेत्ररक्षण करत असो किंवा फलंदाजी, तो त्यात पूर्णपणे रमून जातो. मात्र, ही चर्चा गंभीर नव्हती; तो गंमत करत होता. पण तो आक्रमक दिसत असल्यामुळे असं वाटतं होते की भांडण सुरु आहे. चाहत्यांना उत्साह भलताच असणार आहे कारण विराट कोहली आणि रोहित शर्माला बऱ्याच काळानंतर आता खेळताना पाहायला मिळणार आहे.

शुभमन गिल जखमी शुक्रवारी सरावादरम्यान कर्णधार शुभमन गिलला सिराजचा चेंडू लागला. कोपराला चेंडू लागल्याने त्याने सराव थांबवला. आता तो खेळणार की नाही याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना २७ सप्टेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथे खेळला जाईल.

भारतीय एकदिवसीय संघ शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, आकिब नबी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, गुरनूर ब्रार, नमन धीर.

Follow Us
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना..
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना आणखी उशिर
मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
Lalbag Cha Raja : मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...