AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: ‘तू साराला डेट करतोय का?’… शुभमन गिलने एका शब्दात उत्तर देतं नात्याबाबत सांगूनच टाकलं

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या नात्याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शुभमनला साराबद्दल विचारले असता त्याने एका शब्दात उत्तर देत त्यांच्या नात्याबद्दल सांगून टाकलं. हा व्हिडिओ सध्या ट्रेंड करत आहे. शुभमन सध्या भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार आहे आणि त्याची मैदानावरील आणि मैदानाबाहेरील चर्चा सुरू आहे.

VIDEO: 'तू साराला डेट करतोय का?'... शुभमन गिलने एका शब्दात उत्तर देतं नात्याबाबत सांगूनच टाकलं
| Updated on: Feb 27, 2025 | 11:47 AM
Share

VIDEO: ‘तू साराला डेट करतोय का?’… शुभमन गिलने अखेर त्यांच्या नात्याबाबत सांगूनच टाकलं

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल आपल्या फलंदाजीमुळे नेहमीच चर्चेत असतो. पण शुभमन अजुन एका गोष्टीमुळे नेहमी चर्चेत असतो आणि ती गोष्ट म्हणजे सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर. अनेकदा शुभमन गिलचं नाव सारा तेंडुलकरसोबत जोडलं गेलं आहे. नेहमी त्यांना एकमेकांच्या नावाने चिडवलं जातं, तसेच अनेकदा चाहत्यांकडून त्यांना विचारणाही होते. पण त्यावर शुभमन आणि साराने कधीच भाष्य केलं नाही.

मात्र आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये शुभमनने त्यांच्या नात्याबद्दल काय सत्य आहे सांगून टाकलं. याचबाबतीतला एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यात शुभमनला सारा तेंडुलकरबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना शुभमनने फार रंजक पद्धतीने त्याचं उत्तर दिलं आहे .

नेमकं काय म्हणाला शुभमन?

शुभमन गिल सध्या भारतीय संघासोबत दुबईत आहे. आपल्या शानदार फलंदाजीमुळे त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. व्हायरल होत असलेला मुलाखतीचा व्हिडिओ आताचा नसून जुना आहे. मात्र तो ट्रेंड करत असल्याने हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये होस्ट शुभमनला थेट विचारते की,” तू साराला डेट करतोय का? यावर उत्तर देताना शुभमन ने म्हटलं, ‘कदाचित…’ या त्याच्या एकाशब्दाच्या उत्तराने पुन्हा एकदा त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केल्याचं दिसून आलं. पण त्याने ट्विस्टवालं उत्तर देऊन नक्की सर्वांना विचारातही पाडलं आहे. त्यामुळे त्याने या एका शब्दात त्यांच्या नात्याची कबुली दिली कि त्याला अजून काही सांगायचं होतं हा प्रश्न नक्कीच पडतो.

दोघांचेही फोटो अनेकदा व्हायरल झाले आहेत

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचं नाव खूप आधीपासून जोडलं जात आहे. दोघांचे काही फोटो देखील व्हायरल झाले होते. मात्र दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सारा तेंडुलकर अनेकदा भारताचा सामना पाहण्यासाठी आली आहे. यासह काही महिन्यांपूर्वी ती शुभमन गिलच्या बहिणीसोबत एकाच कारमध्ये दिसून आली होती.त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या चर्चा या होतच आहेत.

शुभमनची जबाबदारी आणखी वाढली

दरम्यान इंग्लंड विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेपासून त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी आणखी वाढली आहे. मैदानातील कामगिरीसह गिल आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असतो. या स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करतोय. तर गिलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात बांगलादेशविरुद्ध खेळताना त्याने शानदार खेळी केली होती. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही संघाला चांगली सुरुवात करून दिली होती.

मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर.
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी.
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती....
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात.
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?.
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर.
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?.
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य.