AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला विराटचा शिक्षक व्हायचंय आणि ‘हा’ धडा शिकवायचाय, शुभमन गिलची इच्छा

भारताचा नवोदित खेळाडू शुभमन गिलला (Shubman Gill) विराट कोहलीचा शिक्षक व्हायचंय. पण शिक्षक होऊन विराटसा त्याला क्रिकेट शिकवायचं नाही तर फिफा व्हिडीओ गेम शिकवायचीय. (Shubman Gill Want To teach Virat Kohli)

मला विराटचा शिक्षक व्हायचंय आणि 'हा' धडा शिकवायचाय, शुभमन गिलची इच्छा
विराट कोहली आणि शुभमन गिल
| Updated on: May 14, 2021 | 2:23 PM
Share

मुंबई : विराट कोहली (Virat Kohi)… जागतिक क्रिकेटमधील अव्वल फलंदाज भलेभले गोलंदाज त्याला गोलंदाजी करायला घाबरतात. त्याच विराट कोहलीचा शिक्षक भारताचा नवोदित खेळाडू शुभमन गिलला (Shubman Gill) व्हायचंय. पण शिक्षक होऊन विराटला त्याला क्रिकेट शिकवायचं नाही तर फिफा व्हिडीओ गेम शिकवायचीय, ज्यामध्ये विराट प्रचंड कमजोर आहे. ESPN क्रिक इन्फोशी बोलताना त्याने विराटचं ‘राज’ सांगितलं. (Shubman Gill Want To teach Virat Kohli)

काय म्हणाला शुभमन गिल?

मला विराट भैय्याला फिफा व्हिडीओ गेम शिकवायचीय. जी त्याला प्रचंड आवडते पण त्या खेळात तो कमजोर आहे. आमच्यामध्ये प्रत्येक वेळी दौऱ्यावर हा खेळ खेळला जातो. पण माझ्याकडून तो प्रत्येक वेळी हरतो. क्रिकेटसारखा या खेळात तो माहिर नाहीय पण त्याला या गेमची आवड आहे, असं शुभमन गिल म्हणाला.

शुभमनने मौका बघून चौकार ठोकला!

इएसपीएनशी बोलताना त्याला, ‘अशी एक गोष्ट सांग की विराटला तू शिकवू शकतोस’ असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी मौका बघून शुभमनने चौकार ठोकला. शुभमनने क्षणाचीही विचार न करता विराटला फिफा व्हिडीओ गेम शिकवेन, असं उत्तर दिलं.

भारतीय संघ 2 जूनला इंग्लंडला रवाना होणार

टीम इंडिया इंग्लंड दौर्‍यावर रवाना होण्याच्या तयारीत आहे. इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी संघात शुभमन गिलचा समावेश आहे. गिलसह उर्वरित भारतीय संघ 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होणार असून 18 जूनपासून वर्ल्ड चँपियनशिपचा अंतिम सामना खेळला जाईल. त्यानंतर टीम इंडियाला 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.

भारत आणि न्यूझीलंड संघादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल

WTC चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे 18 जून ते 22 जून दरम्यान होणार आहे. हा सामना पहिल्यांदा लॉर्ड्स येथे होणार होता, परंतु कोरोनाची परिस्थिती पाहता हा सामना साऊथॅम्प्टन येथे हलविण्यात आला.

(Shubman Gill Want To teach Virat Kohli)

हे ही वाचा :

ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची टीम, संघात रोहित-विराट-धोनीला स्थान नाही, रिषभ पंतकडे कर्णधारपदाची धुरा!

राशीद खानची दुबईत मौजमजा, ‘ही’ महिला क्रिकेटर म्हणते मी पण येऊ का?

‘ये चिंगारी आग लगा सकती हैं’, रिषभ पंत भारताचा टॉपचा कर्णधार असेल, दिग्गजाची भविष्यवाणी

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...