AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राशीद खानची दुबईत मौजमजा, ‘ही’ महिला क्रिकेटर म्हणते मी पण येऊ का?

इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅट (Danielle Wyatt) हिला देखील राशीदच्या फोटोचा हेवा वाटला. तिनेही मी मी दुबईला येऊ का?, अशी मजेशीर कॉमेंट करत रशीदला अडचणीत आणलं. (Rashid Khan Danielle Wyatt)

राशीद खानची दुबईत मौजमजा, 'ही' महिला क्रिकेटर म्हणते मी पण येऊ का?
राशीद खान आणि डॅनियल वॅट
| Updated on: May 14, 2021 | 9:43 AM
Share

मुंबई :  आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित झाल्याने विविध देशांचे खेळाडू मालदीव, दुबईमध्ये सुंदर क्षण व्यतित करतायत. अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशीद खान (Rashid Khan) सध्या दुबईत आहे. सध्या कोणतीही स्पर्धा नसल्याने तो दुबईत सुट्टयांचा आनंद घेतोय. आपल्या इन्स्टाग्रामवरच्या काही फोटोजमधून तो सुंदर क्षण व्यतित करत असल्याचं दिसतंय. नुकताच पोस्ट केलेला एक फोटो पाहून इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅट (Danielle Wyatt) हिला देखील हेवा वाटला. तिनेही मी मी दुबईला येऊ का?, अशी मजेशीर कॉमेंट करत रशीदला अडचणीत आणलं. (Afganistan Cricketer Rashid Khan Enjoy in Dubai England Women Cricketer Danielle Wyatt Comment)

राशीदकडून फोटो शेअर, इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूची कमेंट

राशीदने दुबईमधला एक सुंदर फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या फोटोला त्याने कॅप्शन दिलंय, “चला मजा करुया, ईद मुबारक…”, हा फोटो अनेकांच्या पसंतीस उतरला. अनेक चाहत्यांनी या फोटोवर कमेंट करत राशीदला ईदच्या शुभेच्छा दिल्या.

हीच संधी साधून इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅट हिने राशीद खानच्या इन्स्टाग्राम पोस्टवरवर कमेंट केली. ‘मी पण येऊ का प्लिज?’ अशी कमेंट करत डॅनियलने राशीद खानची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. भल्या भल्या बॅट्समनची दांडी गुल करणाऱ्या राशीदची दांडी डॅनियलने गुल केली.

View this post on Instagram

A post shared by Rashid Khan (@rashid.khan19)

राशीदचं आलिशान घर

राशीद खानने आपल्या आलिशान घराचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोत तो घराच्या मध्यभागी उभ होता. त्यांच्या पाठीमागे घराचा सुंदरसा लूक दिसत होता. घरात रहा, सुरक्षित रहा, जुम्मा मुबारक, असं कॅप्शन त्याने फोटोला दिलं होतं.

राशीदचा आयपीएलमधला परफॉर्मन्स

आयपीएलच्या 14 व्या पर्वात राशीद खानने आपल्या बोलिंगचा जलवा दाखवला. त्याने हैदराबादकडून खेळताना 7 मॅचेसमध्ये 10 विकेट्स मिळवल्या. राशीदच्या दमदार कामगिरीनंतरही हैदराबाद संघ गुणतालिकेत तळाशी राहिला.

(Afganistan Cricketer Rashid Khan Enjoy in Dubai England Women Cricketer Danielle Wyatt Comment)

हे ही वाचा :

‘ये चिंगारी आग लगा सकती हैं’, रिषभ पंत भारताचा टॉपचा कर्णधार असेल, दिग्गजाची भविष्यवाणी

माझं करिअर संपवतोय, मितालीचा आरोप; ‘हिचे नखरेच जास्त’, पोवारचं उत्तर, नेमका वाद काय?, वाचा…

विराटच्या स्वप्नातील ‘नवा भारत’, 6 वर्षांपूर्वी एक स्वप्न पाहिलं, मेहनत घेतली, आज ते पूर्ण झालं!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.