IPL 2022- मुंबई इंडियन्ससाठी एकही मॅच न खेळलेल्या अर्जुन तेंडुलकरसाठी बहीण साराची भावनिक पोस्ट

सारा उपस्थित असलेल्या एका मॅचमध्ये तिने अर्जुनचा एक व्हिडिओ शूट केला होता. तो व्हिडीओ तिने या पोस्टमध्ये शेअर केला आहे. यात अर्जुन बॉलबॉयचे काम करताना दिसतो आहे. त्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला तिने अपना टाईम आयेगा हे गाणे लावलेले आहे.

IPL 2022- मुंबई इंडियन्ससाठी एकही मॅच न खेळलेल्या अर्जुन तेंडुलकरसाठी बहीण साराची भावनिक पोस्ट
Sister Sara's emotional post for Arjun Tendulkar who has not played a single match in Mumbai IndiansImage Credit source: social media
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 10:40 PM

मुंबई – IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians)टीममध्ये संधी मिळालेल्या अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) संपूर्ण सीरिजमध्ये एकाही मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. आता मुंबई इंडियन्सची टीमही IPL 2022 मधून बाहेर पडल्यानंतर, अर्जुन तेंडुलकरची बहीण सारा (Sara Tendulkar)हिने, अर्जुनला चिअर अप करण्यासाठी एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सारा उपस्थित असलेल्या एका मॅचमध्ये तिने अर्जुनचा एक व्हिडिओ शूट केला होता. तो व्हिडीओ तिने या पोस्टमध्ये शेअर केला आहे. यात अर्जुन बॉलबॉयचे काम करताना दिसतो आहे. त्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला तिने अपना टाईम आयेगा हे गाणे लावलेले आहे. यातून तिने अर्जुनला निराश न होता, आपलीही वेळ येईल हा संदेशच दिला असं म्हणता येईल. सध्या साराची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरते आहे.

sara post for Arjun

sara post for Arjun

दोनदा निवड होऊनही संधी नाही

अर्जुन तेंडुलकर या IPL च्या सिझनमध्ये खेळेल असा विश्वास अनेक क्रीडा समीक्षकांनी व्यक्त केला होता. मास्टर ब्लास्टर सचिनच्या मुलाला मैदानावर पाहण्यासाठी त्याचे चाहतेही उत्सुक होते. मात्र ती संधी अर्जुनला मिळालीच नाही. या वेळी झालेल्या लिलावात ३० लाखांची बोली लावून अर्जुनला मुंबई इंडियन्सने विकत घेतले होते, मात्र त्याला एकही मॅचमध्ये संधी मिळाली नाही. गेल्या वर्षीही IPL 2021 मध्ये त्याला मुंबई इंडियन्सनेच विकत घेतले होते, मात्र त्याला त्याही वेळी संधी मिळू शकली नव्हती.

हे सुद्धा वाचा

अपना टाईम आयेगा

साराने पोस्ट केलेल्या व्हिडिओनंतर अनेकांनी तिच्या या पोस्टचं कौतुक केलं आहे. तसंच यावेळी अर्जुनला संधी मिळायला हवी होती, अशा प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या आहेत. एका बहिणीने भावाला दिलेल्या अशा पाठिंब्याचं कौतुकही अनेकांनी केलं आहे. अर्जुनसारख्या आणखी काही क्रिकेटर्सनाही IPL 2022 मध्ये खेळायची संधी मिळाली नाहीये.

मुंबई इंडियन्सची सुमार कामगिरी

यंदाच्या IPLमध्ये अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्स, चैन्नई सुपरकिंग्स् आणि दिल्ली या मोठ्या टीम यंदा प्ले ऑफला पोहचू शकल्या नाहीत. यात मुंबई आणि चैन्नई या दोन्ही टीम यापूर्वी अनेकदा IPLच्या विजेत्या ठरलेल्या आहेत. यातच मुंबई इंडियन्सची कामगिरी यावेळी समाधानकारक होऊ शकली नाही. १४ पैकी केवळ ४ मॅचेस जिंकत ते स्कोअर बोर्डमध्ये रसातळाला राहिले.

 

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.