Smriti Mandhana- Palash Muchhal : स्मृतीशी लग्न टळल्यावर जिच्यासोबत पलाशचा फोटो व्हायरल, अखेर तीच आली समोर अन् म्हणाली..
रविवार 23 नोव्हेंबरला सांगलीत दोघांचं लग्न होणार होतं, पण स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली,त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि त्यानमंतर स्मृती -पलाशंच लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या. पलाशने स्मृतीला चीट केल्याच्या अफवा उडू लागल्या. पलाशने स्मृतीला चीट केल्याच्या अफवा उडू लागल्या. पलाशसोबत जिचं नाव जोडलं गेलं तिने आता पुढे येऊन..

संगीतकार पलाश मुच्छल (Palash Muchhal) आणि भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smriti Mandhan) यांचं लग्न टळल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सध्या त्या दोघांचीच चर्चा आहे. रविवार 23 नोव्हेंबरला सांगलीत दोघांचं लग्न होणार होतं, पण स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली,त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि त्यानमंतर स्मृती -पलाशंच लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या. पण त्यानंतर पलाशने स्मृतीला चीट केल्याच्या अफवा उडू लागल्या. आधी मेरी डिकोस्टा नावाच्या तरूणीने त्याच्यासोबतच चॅट्स व्हायरल केले. चतो डीएममध्ये बलतेसलते मेसेज करायचा असं सांगितलं.
मात्र त्यानंतर आणखी काही मुलींची नाव पलाशसोबत जोडली जाऊ लागली. स्मृती आणि पलाश यांच्या संगीत समारंभाचे नृत्यदिग्दर्शन प्रसिद्ध बॉलीवूड नृत्यदिग्दर्शक जोडी बॉस्को-सीझर यांच्या टीमने केले होते. सोशल मीडियावर अनेक युजर्स हे या कोरिओग्राफरच्या टीममधील मेंबर गुलनाज खानकडे बोट दाखवत होते. तिच्यामुळेच पलाशने स्मृतीला चीट केल्याच्या अनेक चर्चा सुरू झाल्या.त्यानंतर नंदिका द्विवेदी या मुलीचं नाव समोर आलं. अशा अनेक चर्चा सुरू झाल्या. मात्र या दरम्यान पलाश किंवा स्मृतीकडून कोणतही भाष्य करण्यात आलेलं नाही. स्मृतीच्या डिलांना डिस्चार्ज मिळाला असून ती त्यांच्यासोबत व्यस्त आहे. तर पलाशलाही बरं नसल्याच्या बातम्या समोर आल्या असून तो मुंबईतील हॉस्पटिलमध्ये असल्याचे वृत्त आहे.
जिच्यासोबत फोटो व्हायरल अखेर तीच आली समोर अन्
दरम्यान ज्या गुलनाझ खानसोबत पलाशचं नाव जोडलं जात होतं, नेटीझन्स जिच्याबद्दल चर्चा करत होते, तीच आता समोर आली असून तिने या संपूर्ण विषयावर भाष्य करत स्पष्टीकरण दिलं आहे, गुलनाझ खान हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक निवेदन लिहीत या संपूर्ण प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.
‘ सध्या मी आणि माझी मैत्रीण नंदिका हिच्याबद्दल अनेक खोटे तर्कवितर्क आणि चुकीचे क्लेम्स, विधानं केली जात असल्याचं माझ्या निदर्शनास आलं आहे. म्हणून मला एकदाच ही गोष्ट स्पष्ट करायची आहे. सध्या सुरू असलेल्या इश्यूमध्ये आमचा काहीही सहभाग नाहीये. एखाद्या व्यक्तीला सोशली ओळखतो म्हणून किंवा त्या व्यक्तीसोबत फोटो काढला म्हणून आमचं त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याशी घेणंदेणं आहे असं होत नाही. कृपया धाडकन कोणत्याही निर्णयावर येऊ नका, आदर राखा. तुमचा समजूतदारपणा आणि सपोर्ट, यासाठी आभारी आहोत’ असं तिने पोस्टमध्ये नमूद केलं आहे. आपला या प्रकरणाशी दुरान्वयेही संबंध नसल्याचं तिने यातून स्पष्ट केलं आहे.

कोण आहे गुलनाज खान?
गुलनाज खान ही मुंबईतील कोरिओग्राफर आहे. तिच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ती गेल्या 11 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असून ती प्रोफेशनल आणि व्हर्सेटाईल डान्सर आहे. 2006 साली ती बॉस्को-सीझर टीममध्ये सामील झाली आणि आजही त्यांच्यासोबत काम करते.
दरम्यान स्मृती आणि पलाश यांचं लग्न कधी होणार, त्यांच्यात सगळं ठीक आहे ना, असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात असून त्या दोघांना एकत्र पाहण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र स्मृती किंवा पलाश यांच्यापैकी कोणीच यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी पलाशची बहीण , पलक हिने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे शेअर केले होते. स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे हा निर्णय घेतल्याचे तिने नमूद केले. तर पलाश-स्मृतीचं लग्न लवकरच होईल, असा विश्वास त्याच्या आईने व्यक्त केला.
