‘ये चिंगारी आग लगा सकती हैं’, रिषभ पंत भारताचा टॉपचा कर्णधार असेल, दिग्गजाची भविष्यवाणी

कर्णधार चुका करतात, तशा चुका रिषभही करेल पण तो चुकांमधून शिकत जाईल आणि एक दिवस भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांमध्ये रिषभचं नाव असेल, असं गावस्कर म्हणाले. (Sunil Gavaskar Call Rishabh Pant Future Captain)

'ये चिंगारी आग लगा सकती हैं', रिषभ पंत भारताचा टॉपचा कर्णधार असेल, दिग्गजाची भविष्यवाणी
भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी रिषभ पंतचं कौतुक केलं आहे.
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 7:55 AM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने गेल्या काही महिन्यांत तरुण आणि नवोदित खेळाडूंच्या जोरावर यश संपादन केलं आहे. या खेळाडूंनी संधी मिळेल तशी त्यांची त्यांची जबाबदारी अतिशय व्यवस्थित सांभाळली आमि संघाला विजय मिळवून दिले. याच खेळाडूंपैकी एक खेळाडू म्हणजे यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant)… हा फक्त खेळाडू म्हणूनच सर्वोत्तम नाहीय तर त्याने कॅप्टन्सीमध्येही आपला जलवा दाखवलाय. नुकतंच आयपीएलचं 14 वं पर्व पार पाडलं. यामध्ये रिषभने दिल्ली कॅपिटल्सची यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. रिषभच्या कामगिरीवर भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) खूश झाले आहेत. त्यांनी रिषभ भारताचं उद्याचं भविष्य असेल तसंच तो सर्वोत्तम कर्णधारांपैकी टॉपचा कर्णधार असेल, अशी भविष्यवाणी केली आहे. (Sunil Gavaskar Call Rishabh Pant Future Captain)

काय म्हणाले सुनील गावस्कर

उद्याच्या काळात रिषभ पंत भारताचं नेतृत्व करेल. गावस्कर यांनी एक लेख लिहिलाय. या लेखात ‘ये चिंगारी आग लगा सकती हैं’, असं रिषभ पंतचं वर्णन त्यांनी केलंय. पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलमध्ये कमाल केली. सहाव्या सामन्यापर्यंत रिषभला कर्णधारपदावरुन प्रत्येक मॅच प्रेझेंटर प्रश्न विचारायचा, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊन रिषभ थकला होता. पण रिषभच्या खांद्यावर ऐनवेळी जबाबदारी देऊनही त्याने सर्वोत्तम कामगिरी केली. या चेहरा भारताचं भविष्य असेल, अशी तोंडभरुन स्तुती गावस्कर यांनी केली आहे.

आयपीएलमध्ये रिषभचा जलवा

भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीत त्यांनाच आस्मान दाखवणयाची अद्वितीय कामगिरी केली. या विजयाने भारताचा डंका जगात वाजला. पण हा विजय मिळवण्यात रिषभ पंतचा मोलाचा वाटा राहिला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत देखील रिषभने शानदार परफॉर्मन्स केला तसंच त्याने विकेट कीपिंगमध्येही सुधारणा केल्या. याच कारणामुळे टी 20 आणि वन डे क्रिकेटमध्ये त्याचं पुनरागमन झालं. आयपीएलमध्ये दिल्लीचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर जेव्हा दुखापतग्रस्त झाला तेव्हा धवन, रहाणे, स्मिथ या दिग्गजांना पछाडत त्याने दिल्लीचं कर्णधारपद मिळवलं आणि केवळ मिळवलंच नाही तर आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडूनही दाखवली.

भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांमध्ये रिषभचं नाव असेल

आपल्या चुका दुरुस्त करुन वेगात पुढे जाण्याचं कसब रिषभजवळ आहे. मागील काळात त्याने ते कसब संपूर्ण जगाला दाखवून दिलंय. कर्णधार चुका करतात, तशा चुका रिषभही करेल पण तो चुकांमधून शिकत जाईल आणि एक दिवस भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांमध्ये रिषभचं नाव असेल, असं गावस्कर म्हणाले.

(Sunil Gavaskar Call Rishabh Pant Future Captain)

हे ही वाचा :

माझं करिअर संपवतोय, मितालीचा आरोप; ‘हिचे नखरेच जास्त’, पोवारचं उत्तर, नेमका वाद काय?, वाचा…

विराटच्या स्वप्नातील ‘नवा भारत’, 6 वर्षांपूर्वी एक स्वप्न पाहिलं, मेहनत घेतली, आज ते पूर्ण झालं!

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.