AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav : जे रोहित-कोहलीला जमलं नाही, ते सूर्यकुमारने करुन दाखवलं, IPL मध्ये रचला इतिहास

Suryakumar Yadav : आयपीएल 2025 मध्ये सूर्यकुमार यादव शानदार फॉर्ममध्ये आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात सूर्या एक स्फोटक इनिंग खेळला. या इनिंगसोबत त्याने एक कारनामा केला, जो आयपीएलमध्ये याआधी कोणाला जमलेला नाही.

Suryakumar Yadav : जे रोहित-कोहलीला जमलं नाही, ते सूर्यकुमारने करुन दाखवलं, IPL मध्ये रचला इतिहास
सूर्यकुमार यादवImage Credit source: Twitter
| Updated on: May 02, 2025 | 9:30 AM
Share

टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच आयपीएल 2025 मध्ये दमदार प्रदर्शन सुरु आहे. तो सीजनच्या पहिल्या सामन्यापासून धावा बनवतोय, त्यामुळे मुंबईची टीम पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर आहे. मुंबई इंडियन्सने चालू सीजनमध्ये आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. यात सात विजयांसह ते सर्वात पुढे आहेत. खास बाब म्हणजे सूर्याने या सर्व 11 सामन्यात आपल्या फलंदाजीने महत्त्वाच योगदान दिलय. 1 मे रोजी राजस्थान विरुद्ध सामन्यात तो स्फोटक इनिंग खेळला. आयपीएलमधला एक मोठा रेकॉर्ड त्याने आपल्या नावावर केला.

सूर्यकुमार यादव सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तो प्रत्येक सामन्यात धावा बनवतोय. राजस्थान रॉयल्स विरुद्ध सुद्धा त्याने 23 चेंडूत नाबाद 48 धावा फटकावल्या. त्याने 208.69 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. यात चार चौकार आणि तीन षटकार आहेत. सूर्याने या इनिंगमध्ये 25 धावांचा टप्पा पार करताच एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. त्याने सलग 11 आयपीएल सामन्यात 25 प्लस धावा केल्या आहेत. याआधी कुठल्याही फलंदाजाने आयपीएलमध्ये इतक्या सातत्याने धावा केलेल्या नाहीत.

हा रेकॉर्ड कुठल्या खेळाडूच्या नावावर होता?

याआधी हा रेकॉर्ड माजी भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाच्या नावावर होता. रॉबिन उथप्पाने आयपीएलच्या वर्ष 2014 च्या हंगामात केकेआरकडून खेळताना सलग 10 सामन्यात 25 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. पण आता सूर्यकुमार यादव त्याच्या पुढे निघून गेला आहे. या दमदार प्रदर्शनामुळे सूर्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पुढे आहे. त्याने या सीजनमध्ये आतापर्यंत 11 सामन्यात 67.85 च्या सरासरीने 475 धावा केल्या आहेत. यात तीन हाफ सेंच्युरी आहेत.

आपलाच रेकॉर्ड मोडण्यापासून सूर्या अजून किती धावा लांब?

सूर्यकुमार यादवसाठी आयपीएलचा हा बेस्ट सीजन ठरु शकतो. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत दोन वेळाच 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सूर्यासाठी वर्ष 2023 बेस्ट सीजन ठरला होता. त्यावेळी त्याने 16 सामन्यात 43.21 च्या सरारीने 605 रन्स केल्या होत्या. आता तो आपला हा रेकॉर्ड तोडण्याचा प्रयत्न करेल. त्यापासून तो अजून 126 रन्स दूर आहे. 2026 टी20 वर्ल्ड कप लक्षात घेता सूर्याचा हा फॉर्म टीम इंडियासाठी चांगले संकेत आहेत. सध्या तो भारताच्या टी20 टीमचा कॅप्टन आहे.

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.