AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : श्रेयसच्या प्रकृतीसाठी सूर्या भाईच्या आईची प्रार्थना, भावूक करणारा व्हिडीओ समोर!

भारताचा स्टार क्रिकेटपटू श्रेयस अय्यरवर सध्या सीडनीमध्ये उपचार चालू आहेत. असे असतानाच आता सूर्यकुमार यादवच्या आईचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Video : श्रेयसच्या प्रकृतीसाठी सूर्या भाईच्या आईची प्रार्थना, भावूक करणारा व्हिडीओ समोर!
suryakumar yadav mother and shreyas iyer
| Updated on: Oct 29, 2025 | 7:57 PM
Share

ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात झेल पकडताना भारताचा स्टार क्रिकेटपटू श्रेयस अय्यर जखमी झाला. त्याच्या बरगड्यांना मोठी इजा झाली आहे. दुखपात होताच श्रेयस अय्यरल थेट आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. आता मात्र त्याची प्रकृती चांगली आहे. टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून भूमिका बजावणाऱ्या सूर्यकुमार यादवने श्रेयस अय्यरची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले होते. दरम्यान, आता याच सूर्या भाईच्या आईने श्रेयस अय्यरच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. या प्रार्थनेचा प्रत्येकाचाच उर भरून यावा असा व्हिडीओ समोर आला आहे.

सूर्यकुमारच्या आईचा भावूक करणारा व्हिडीओ समोर

श्रेयस अय्यरच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. चिंतेचे कोणतेही कारण नाही, असे डॉक्टरांनी सांगितलेल आहे. मात्र सूर्यकुमार यादवच्या आईने श्रेयस अय्यर लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे. सूर्यकुमारच्या आईचा छट पूजेदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सूर्यकुमारची आई प्रार्थना करताना दिसत आहे. हाच व्हिडीओ सध्या चांगला व्हायरल होत आहे.

व्हिडीओत नेमके काय आहे?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सूर्यकुमार यादवची आई दिसत आहे. सूर्यकुमारची आई तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच श्रेयस लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करा असे आवाहन करताना दिसत आहे. श्रेयसची प्रकृती बरी नसल्याचे मी काल ऐकले आहे. मला ते ऐकून खूप वाईट वाटले. त्यामुळेच तो लवकर बरा व्हावा यासाठी सगळे प्रार्थना करा, असे त्या म्हणताना दिसत आहेत. सर्वांना प्रार्थनेचे आवहान केल्यानंतर त्यांनी छठी मातेचे नाव प्रार्थना केली.

लगेच रक्तस्त्राव थांबवण्यात आला

दरम्यान, श्रेयसच्या प्रकृतीबाबत सांगण्यासाठी मंगळवारी (28 ऑक्टोबर) बीसीसीआयने अधिकृत निवेदन दिले आहे. “श्रेयस अय्यरला दुखापत झाल्याने त्याच्या शरीराच्या आत रक्तस्त्राव झाला आहे. त्याला नेमके कुठे लागले आहे हे ओळखून लगेच रक्तस्त्राव थांबवण्यात आला. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टर त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत,” असे बीसीसीआयने सांगितले.

दरम्यान, सूर्यकुमार यादवही सध्या ऑस्ट्रेलियातच आहे. ऑस्ट्रेलियात भारत आणि ऑस्ट्रेलियात 5 सामन्यांची टी-20 श्रृंखला खेळली जाणार आहे. या काळात श्रेयस अय्यरवर सीडनीच्या रुग्णालयात उपचार केले जातील.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.