
T20 World Cup 2026, Team India Net Run Rate : टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर-8 स्टेजमध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा भारतीय संघाचा मार्ग आता चांगलाच खडतर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांनी पराभव झाल्यामुळे टीम इंडियाचा नेट रन रेट (NRR) -3.800 वर पोहोचला आहे. आता ग्रुप 1 मध्ये झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचे दोन महत्त्वाचे सामने शिल्लक आहेत. मात्र सेमीफयानलमध्ये प्रवेश करायचा असेल तरटीम इंडियाला हे दोन्ही सामने जिंकावे लागतील, एवढंच नव्हे तर NRR मध्ये (Net Run Rate) देखील लक्षणीय सुधारणा करावी लागेल. कारण टायमध्ये NRR हा महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. टीम इंडियाचा पुढील सामना झिम्बाब्वेविरुद्ध आहे. त्यामुळे या मॅचमध्ये Net Run Rate हा निगेटीव्ह वरून पॉझिटिव्ह , प्लस कसा होईल याकडे संघाचं संपूर्ण लक्ष असणार आहे.
टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
पुढल्या सामन्यात भारताला झिम्बाब्वेविरुद्ध मोठा विजय मिळवावा लागेल, तसेच रन-रेटमध्ये देखील लक्षणीय फरक निर्माण करावा लागेल. जर भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर त्यांना झिम्बाब्वेला कमी धावसंख्येतच रोखावं लागेल आणि त्यांनी दिलेल्या टार्गेटचाही लवकर पाठलाग करून मॅच जिंकावी लागेल. टार्गेट जितकं छोटं, तितक्या पटकन, लवकर चे पूर्ण करण्याची गरज असेल, आणि त्यासाठी आक्रमक फलंदाजी करणंही महत्वाचं ठरेल.
लक्ष्य लवकर गाठावे लागेल.
किती रनचं टार्गेट किती ओव्हर्समध्ये गाठावं लागेल ?
समजा पुढल्या सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाने जर केवळ 90 धावा केल्या तर भारताला हे टार्गेट फक्त 9 ओव्हर्समध्ये गाठावं लागेल. इतक्या जलद पाठलागामुळे NRR( रन रेट) मध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते आणि नकारात्मक निकालाचे सकारात्मक निकालात रूपांतर होण्याची शक्यताही वाढू शकते.
पण जर 150 धावांचं टार्गेट असेल तर टीम इंडियाल 11 ओव्हर्समध्येच विज मिळवावा लागेल, ही खूप कठीण असेल, पण पहिल्या फळीने आक्रमक, स्फोटक खेळी केली तर हे शक्य आहे. अशा स्थितीतच भारताचा निगेटीव्ह रन रेट हा पॉझिटिव्ह होऊ शकतो.
पण जर झिम्बाब्वेच्या संघाने 180 ते 200 च्या मध्ये धावा केल्या, तर भारताला 12 ते15 ओव्हर्समध्येच मॅच संपवावी लागेल. यामुळे NRRमध्ये सुधारणा होईल, मात्र सकारात्मक निकाल मिळविण्यासाठी एवढंच बाकी नाही, अजूनही मेहनत करावीच लागेल. म्हणजेच, याचा अर्थ असा की, टार्गेट जितकं मोठं रिक्वायर्ड रन रेटही तितकाच जास्त असेल.
पहिले फलंदाजी केली तर ?
मात्र या सामन्यात टीम इंडियाने जर प्रथम फलंदाजी केली तर नेट रन रेट नकारात्मक (-) वरून सकारात्मक (+) वर आणणं थोडं कठीण होऊ शकतं. भारताला प्रथम फलंदाजी करताना 220 किंवा 250+ धावा कराव्या लागतील. त्यानंतर, त्यांना विरोधी संघाला 100-120 धावा किंवा त्यापेक्षा कमी धावसंख्येपर्यंतच रोखाव लागेल. जर भारतीय संघाने विरोधी संघाला बाद केले तर त्यांना जास्त षटके टाकण्याचा फायदा होईल, कारण ऑलआउट झाल्यास, नेट रन रेटमध्ये महत्त्वाचा फायदा होतो. पहिल्या सामन्यात टीम इंडिया स्वतःच ऑलआऊट झाली होती, म्हणूनच संघाचा नेट रन रेट इतका खालावला आहे.