T20 World Cup 2026 : ICC टूर्नामेंटमधून बांगलादेशचा पत्ता कट ? या देशाची होणार एंट्री ?
Bangladesh, T20 World Cup 2026 : बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला ICC दिलेली डेडलाइन संपत आली आहे. मात्र त्यानतंर बांगलादेश त्यांच्या आठमुठ्या भूमिकेवर कायम राहिला तर मग त्यांचा पत्ता कट होू शकतो आणि बांदलादेश ऐवजी दुसऱ्या संघाची या स्पर्धेत एंट्री होऊ शकते.

Bangladesh Cricket Board : आगामी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेमध्ये खेळणार की नाही हे ठरवण्याासठी बांगलादेशच्या संघाला दिलेली डेडलाइन आता संपत आली आहे. 17 जानेवारी रोजी ढाका येथे झालेल्या बैठकीत ICC ने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आपला निर्णय सांगण्यासाठी 21 जानेवारी ही डेडलाइन दिली होती. मात्र आता ही नुदत संपल्यानंतर देखील बांगलादेशकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही. त्यांनी मौन कायम ठेवलं असून पुढेही ते असेच गप्प राहिल्यास आगामी T20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतून त्यांचा पत्ता कट होऊ शकतो.
बांगलादेशचा अंतिम निर्णय काय ?
ICCसोबत जेव्हा शेवटची चर्चा झाली तेव्हा बांगलादेश क्रिकेट बोर्ड आपल्या मागणीवर ठाम होते. आम्हाला या स्पर्धेत खेळायचं आहे पण आमचे सामने भारताबाहेर, श्रीलंकेत खएलवले जावेत, अशी त्यांची मागणी होती. भारत आणि श्रीलंका असे या स्पर्धेचे दोन होस्ट आहेत. त्याच बैठकीत, बांगलादेशने आपल्या खेळाडूंच्या सुरक्षिततेचे कारण पुढे करत भारतात न खेळण्याबद्दल स्पष्टीकरण दिलं होतय. तसेच बांगलादेशने आयर्लंडसोबतच्या गटात बदल करण्याची विनंती देखील केली. बांगलादेशचटा संघ हा ग्रुप सीमध्ये तर आयर्लंड ग्रुप बी मध्ये आहे, त्यांना त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत खेळावे लागतील. म्हणूनच बांगलादेशने ही मागणी केली आहे.
आयसीसीची डेडलाइन संपणार
मात्र, बांगलादेशच्या मागण्यांचा आयसीसीवर कोणताही परिणाम झाला नाही, स्पर्धेचे वेळापत्रक किंवा गट बदलले जाणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी आयसीसीने बीसीबीला 21 जानेवारीपर्यंत अल्टिमेटम दिला.
बांगलादेशचा संघ नाही तर कोणाला मिळणार संधी ?
मात्र आता ही मुदत संपली असून जर बांगलादेशचा संघ या स्पर्धेत खेळणार नसेल तर कोणाला संध मिळणार असा सवाल अनेकांच्या मनात आहे. बांगलादेश क्रिकेट संघाने निर्णय घेतला नाही तर ते स्पर्धेतून बाहेर पडू शकतात आणि अशा परिस्थितीत स्कॉटलंडला खेळण्याची संधी मिळू शकते. त्यांच्या श्रेष्ठ रँकिंगच्या आधारे स्कॉटलंडचा संघ आगामी टी-20 विश्वचषकात बांगलादेशची जागा घेऊ शकतो. मात्र, आयसीसीने या प्रकरणाबाबत अद्याप स्कॉटिश क्रिकेट बोर्डाशी संपर्क साधलेला नाही अशी माहिती समोर आली आहे.
